शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
3
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
4
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
5
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
6
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
7
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
8
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
9
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
10
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
11
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
12
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
13
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
14
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
15
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
16
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
17
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
18
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
19
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
20
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा

पाणी कमी पिणाऱ्यांना असतो सिस्टायटिसचा जास्त धोका, जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 11:27 IST

थंडीच्या दिवसात अनेकजण पाणी पितात. मात्र कमी पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनसोबतच संक्रमणाचा धोकाही वाढतो. ही संक्रमण महिलांमध्ये अधिक प्रमाणात बघायला मिळतं.

थंडीच्या दिवसात अनेकजण पाणी पितात. मात्र कमी पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनसोबतच संक्रमणाचा धोकाही वाढतो. ही संक्रमण महिलांमध्ये अधिक प्रमाणात बघायला मिळतं. पण तसंही पाणी कमी पिणे पुरुष आणि महिला दोघांसाठीही हानिकारक ठरु शकतं. पाणी कमी प्यायल्याने सिस्टायटिस हे संक्रमण होण्याचा धोका अधिक असतो. सिस्टायटिस हे एकप्रकारचं इन्फेक्शन आहे जे लघवीच्या मार्गात अडसर निर्माण करतं. यामुळे ब्लॅडर वॉलमध्ये सूज येते. तसा हा काही फार गंभीर आजार नाहीये. पण याने लघवीच्या मार्गात जळजळ आणि वेदना होऊ शकतात. सिस्टायटिस संक्रमण हे सामान्यपणे बॅक्टेरिअल इन्फेक्शनमुळे होतं. 

महिलांमध्ये सिस्टायटिसचा धोका अधिक असतो. कारण पुरुषांच्या तुलनेत महिलांचं यूरिनरी ब्लॅडर म्हणजेचे मुत्राशय आकाराने लहान असतं. पण याचा अर्थ हा नाही की, पुरुषांना हे संक्रमण होत नाही. महिलांमध्ये गर्भवस्थेत हे संक्रमण होण्याचा धोका अधिक वाढतो. 

काय आहेत कारणे?

सिस्टायटिस संक्रमण होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. पण सामान्यपणे पाणी कमी प्यायल्याने हे संक्रमण होण्याचा धोका अधिक वाढतो. शरीरात पाणी कमी असल्याने शरीरातील विषारी तत्व पूर्णपणे बाहेर येऊ शकत नाहीत. याच विषारी तत्वांमुळे पोटात बॅक्टेरिया तयार होतात, जे मुत्राशयात पोहोचून संक्रमणाचं कारण ठरतात. त्यामुळे शरीरात कोणत्याही प्रकारचं संक्रमण झाल्यास तरल पदार्थांच सेवन सुरु करायला हवं. 

सिस्टायटिसची लक्षणे

- लघवी करताना जळजळ आणि वेदना होणे- लघवीसोबत रक्तही निघणे- लघवीतून दुर्गंधी येणे - कंबरेच्या खालच्या भागात वेदना होणे- सतत लघवी लागल्यासारखे वाटणे- वयोवृद्ध लोकांना थकवा आणि ताप येणे- सतत लघवी लागणे पण लघवी कमी होणे

कसा कराल बचाव?

सिस्टायटिस हा गंभीर आजार नाहीये. त्यामुळे याला घाबरण्याचं कारण नाही. सामान्यपणे आवश्यक ती काळजी घेतली तर ३ ते ४ दिवसात तुम्ही ठीक होऊ शकता. पण जर ही समस्या ४ दिवसात दूर झाली नाही तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सिस्टायटिसपासून बचाव करण्यासाठी काही खास गोष्टींची काळजी घेणे फायदेशीर ठरतं. 

सिस्टायटिस दरम्यान स्वच्छतेची काळजी घ्यावी. सिस्टाटिस संक्रमण झाल्यास तरल पदार्थांचं सेवन करा आणि जास्तीत जास्त पाणी प्यावे. कॅफीन असलेले कोल्ड्रींक्स आणि कोल्ड ड्रिंक्सचं सेवन बंद करा. मद्यसेवन आणि धुम्रपानही बंद करावे. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planपौष्टिक आहारWaterपाणी