ऑर्थो क्लिनिकलकडून कोरोना अँटीबॉडी टेस्ट किट लाँच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 11:44 IST2020-06-18T11:43:47+5:302020-06-18T11:44:11+5:30
बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक अँटीबॉडी टेस्ट किट्सपेक्षा ऑर्थोचे किट उच्चप्रतीचा रिझल्ट देण्यास सक्षम आहे.

ऑर्थो क्लिनिकलकडून कोरोना अँटीबॉडी टेस्ट किट लाँच
ऑर्थो क्लिनिकल डायग्नोस्टिककडून कोरोना अँटीबॉडीचे 100 टक्के अचूक निकाल देणारी टेस्ट किट लाँच करण्यात आली आहेत. याद्वारे एखाद्या लॅबमध्ये कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आला असल्यास त्याची पुन्हा खात्री करता येणार आहे.
ऑर्थोच्या VITROS®Anti-SARS-CoV-2 आणि IgG टेस्टद्वारे विश्वासाने आधी कोरोनाची लागण झालेली असल्यास पुन्हा तपासणीसाठी टेस्ट करता येणार आहे.
बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक अँटीबॉडी टेस्ट किट्सपेक्षा ऑर्थोचे किट उच्चप्रतीचा रिझल्ट देण्यास सक्षम आहे. या किटच्या चाचणीमध्ये विश्वास आणि 100 टक्के अचूक निदान केल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या कोरोनाग्रस्तांनी बरे झाल्यावर प्लाझ्मा असलेली अँटीबॉडी दान केली आहे त्यांच्या चाचणीसाठी हे खरे ठरणार आहे. ही चाचणी अशासाठी गरजेची आहे कारण जर प्लाझ्मा थेरपी अँटीबॉडीशिवाय केली गेली तर त्यातील कार्यरत असलेले अत्यावश्यक घटक थेरपीमध्ये मिळणार नाहीत. यामुळे अँटीबॉडीचे रिझल्ट अचूक येणे गरजेचे आहे. ऑर्थोची ही किट रॅपीड/ CLIA/ ELISA सीडीएससीओ मान्यताप्राप्त यादीमध्ये आहेत.