(image credit-DW)
तुमच्या त्वचेवर तीळ आहे का? तीळ हे सुंदरतेचे प्रतिक म्हणून सगळ्यानाच आवडत असतं. जर तुमच्या त्वचेवर तीळ दिसत असेल तर तो स्किन कॅन्सरचं कारण सुद्धा असू शकतो. त्यामुळे त्वचेची तपासणी करणं गरजेचं आहे. तीळ आणि मेलेनोमा कॅन्सरच्यामध्ये एक रेष असते. अनेकदा स्किन कॅन्सरच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा आजार वाढत जातो.
जर तुमच्या शरीरातील काही भागांवर तीळ असेल असेल तर आणि त्याठिकाणी सूज येणे, त्या भागाचा आकार वाढणे, अशी समस्या जाणवत असेल तर तपासणी करणं गरजेचं आहे. कारण ही लक्षणं त्वचेवर होत असलेल्या मेलानोमा कॅन्सरची असू शकतात. त्वेचच्या त्या भागात मेलेनोसाईट्सची वाढ होत असते. आज आम्ही तुम्हाला या आजाराबद्दल काही गोष्टी सांगणार आहोत जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्हाला हा आजार आहे की नाही .
या प्रकारचा कर्करोग शरीरावर कुठेही होऊ शकतो. मिलानोसाईटस् पेशींमध्ये त्वचेचा कर्करोग होतो. त्यालाच मेलानोमा असे म्हणतात. कोणत्याही रंगाच्या त्वचेला या कर्करोगाचे निदान होऊ शकते. लवकर उपचार न केल्यास तो शरीरावरील इतर भागांवरही पसरु शकतो. तपकिरी रंगाचा डाग, रंग आणि आकार बदलणारे तीळ आणि दुखणारी लाल, तपकिरी जखम किंवा खरूज ही मेलानोमा या कँसरची लक्षणं आहेत.
सामान्य तीळ
एका तिळाचा आकार ¼ इंचापेक्षा कमी असतो. सर्वसाधारणपणे नरम आणि गोल आकारात हे तीळ सुरूवातीला त्याचा रंग हलका असतो. नंतर गडद होत जातो. सर्वाधिक लोकांच्या शरीरावर असलेले तीळ हे गोल आकारात असतात. जेव्हा तुम्ही मध्यभागातून त्याचं विभाजन करता तेव्हा दोन्ही बाजूंनी एकसमान असतं. पण तीळ जर मोठ्या आकारात पसरत असेल तर त्यासाठी स्किन एक्सपर्टचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
तीळ हा स्पर्शाने कसा जाणवतो
जर तुम्ही शरीरावर तीळ असलेल्या जागी स्पर्श केला आणि तीळ जर मऊ आणि मुलायम असेल तर तो सामान्य तीळ असू शकतो. पण जर हात लावल्यानंतर खडबडीत भाग, फुगलेली त्वचा आणि सतत त्यावर पापडी येत असेल तर दुर्लक्ष केल्यास महागात पडू शकतो. म्हणून शक्य तितक्या लवकर तपासणी करून घ्या. ( हे पण वाचा-काय सांगता? होळीच्या रंगांनी टळतो गंभीर आजारांचा धोका, जाणून घ्या कसा)
सामान्य तीळ वेदनादायक नसतो. तुम्ही त्या भागावर कितीही दाबलं तरी वेदना होणार नाहीत. पण जर तीळ असलेल्या ठिकाणी तुम्हाला खाज किंवा सुज आली असेल तर हे मेलेनोमा कँन्सरचं लक्षणं असू शकतं. स्किन एक्सपर्ट्सशी संपर्क करून तुम्ही त्वचेची तपासणी करणं गरजेचं आहे. ( हे पण वाचा- फक्त ७ दिवस दुधासोबत सुंठाचं सेवन कराल तर 'हे' आजार कधी दूर होतील कळणार सुद्धा नाही)