शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

तुमचे पाय देतात तुम्हाला धोक्याचे संकेत, पायांवरील 'या' लक्षणांवरुन वेळीच ओळखा 'हे' गंभीर रोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 17:47 IST

मधुमेह (Diabetes), थायरॉईड, गँगरीन, संधिवात आणि हृदयविकार (Heart Problems) पायात दिसणाऱ्या काही लक्षणांवरून ओळखता येतात. आपल्याला ही लक्षणं जाणवल्यास आजार वाढण्यापासून थांबविला जाऊ शकतो.

तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण पायावरूनही (Feet) आपल्या आरोग्याची स्थिती काय आहे हे ओळखता येऊ शकते. मधुमेह (Diabetes), थायरॉईड, गँगरीन, संधिवात आणि हृदयविकार (Heart Problems) पायात दिसणाऱ्या काही लक्षणांवरून ओळखता येतात. आपल्याला ही लक्षणं जाणवल्यास आजार वाढण्यापासून थांबविला जाऊ शकतो.

सुजलेले पायपायांना सूज येणं हे मूत्रपिंडाच्या (किडनी) आजाराचे किंवा अशक्तपणाचे लक्षण असू शकते. दुसरीकडे, जर पायाच्या वेगवेगळ्या भागात वेदना किंवा सूज दिसली तर ते संधिवात किंवा हृदयाशी संबंधित आजारांमुळे देखील असू शकते. सांधेदुखीमध्येही पायाच्या अंगठ्याला सूज येऊ शकते. जर पायाच्या बोटावर लाल पट्टे दिसले तर ते हृदयाच्या संसर्गाचे लक्षण असू शकते.

पायात मुंग्या येणेपायांना मुंग्या येणं हे उच्च रक्तदाब किंवा उच्च रक्तातील साखरेचे लक्षण असू शकते. या स्थितीत रक्ताभिसरण बिघडते, त्यामुळे पायात मुंग्या येतात. शरीरात व्हिटॅमिन ई आणि डीच्या कमतरतेमुळे पायांना मुंग्या येऊ शकतात. मधुमेहामुळेही पायाच्या अंगठ्याला सूज येऊ शकते. मधुमेहामुळेही टाचदुखी होऊ शकते. दुसरीकडे, पायांमध्ये कोरडेपणा थायरॉईड रोगाचे लक्षण असू शकते.

पायांचा रंग बदलणेजर पायांचा रंग बदलत असेल तर ते गॅंग्रीनमुळे असू शकते. हा जीवाणूजन्य आजार शरीरात योग्य रक्ताभिसरण न झाल्यामुळे होऊ शकतो.

बोटे जाड होणेपायाची बोटे जाड होणे हे आतड्याच्या आजाराचे लक्षण आहे. हे फुफ्फुसाच्या कर्करोगात आणि हृदयविकारामुळे देखील हे होऊ शकते. जर तुमच्या पायाचे बोट किंवा अंगठा नेहमी दुखत असेल तर ते शरीरात जास्त प्रमाणात युरीनचे लक्षण आहे. यामुळे शरीरातील यूरिक अ‍ॅसिडची पातळी वाढते.

पाय दुखणेजर तुमचा संपूर्ण पाय दुखत असेल तर ते खराब रक्ताभिसरणामुळे असू शकते. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यावर संपूर्ण पायात वेदना होतात आणि सांधेदुखीचा त्रासही होतो. याशिवाय जर शरीरात व्हिटॅमिन्स, मिनरल्स, पोटॅशियम किंवा कॅल्शियमची कमतरता असेल तरी पाय दुखू शकतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स