शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
3
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
4
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
5
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
6
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
7
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
8
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
9
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
10
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
11
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
12
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
13
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
14
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
15
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
16
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
17
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
18
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?
19
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
20
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?

काय आहेत अ‍ॅक्टीव्ह थायरॉइडची लक्षणं, कशी घ्याल काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 16:03 IST

सध्याच्या काळात अनियमीत खाण्यापिण्याच्या सवयी आणि बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांना तसंच तरूणींना  जीवघेणे आजार उद्भवत आहेत.

सध्याच्या काळात अनियमीत खाण्यापिण्याच्या सवयी  आणि बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांना तसंच तरूणींना  जीवघेणे आजार उद्भवत आहेत. मधुमेह, रक्तदाब यांसारखे आजार कमी वयात होत आहेत. झोप न येणे, थकल्यासारखं वाटणं, एकाग्रता कमी होणं, सतत नैराश्य येणे. तुम्हालाही या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर त्वरीत  वैद्यकीय तपासणी करणं  गरजेच आहे. ही लक्षणं अंडर अ‍ॅक्टिव्ह थायरॉईडची असू शकतात.

 मानेच्या खालच्या भागात असलेल्या एडम्स अ‍ॅपलच्या मागच्या बाजूला फुलपाखराचा आकार असलेली ग्रंथी असते. त्या ग्रंथीला थायरॉईड ग्लँड असे म्हणतात. त्या भागात संतुलन बिघडल्याने हा आजार उद्भवतो. थायरॉईडच्या समस्येमुळे अचानक वजन कमी होऊ शकतं. किंवा वाढू सुध्दा शकतं. सर्वाधिक समस्या ही ओव्हर अ‍ॅक्टिव्ह थायरॉईड ग्रंथी म्हणजे हायपर थायरॉईडिझममुळे होते. जाणून घ्या थायरॉईडची लक्षणं.

(Image credit- BBC)

मासिक पाळीत अनियमितता,

अशक्तपणा, तंद्री, शक्ती गमावणे,

अचानक मूडमध्ये बदल, 

गळ्याला तसेच  हाता-पाय सूज येणे,

अचानक वजन वाढणे,

अन्न पचण्यासाठी त्रास होणे,

कोरडी त्वचा पडणे,

केस गळणे,

 भारतात १३ टक्के महिला या हायपोथायरॉइडच्या आजाराने ग्रस्त आहेत.  राहणीमानाच्या पध्दतीत बदल करून थॉयरॉईडच्या जाळ्यातून मुक्तता होऊ शकते. व्यवस्थीत झोप घेणे, व्यायाम करणे, योगा करणे. अशा पध्दतीने आरोग्याची काळजी घेतल्यास आरोग्य उत्तम राहील. 

झोप पूर्ण घ्या -

(Image credit- the conversation) 

हाइपोथायरॉडिज्म हा आजार झोपेत असताना मेंदुला प्रभावित करतो. या आजारापासून वाचण्यासाठी नियमीतपणे झोप घेणे गरजेचे आहे.  ७-८ तास रोज झोप घेतल्यास शरीर ताजेतवाने राहील. तसेच आजारांपासून संरक्षण करता येईल.

संतुलीत आहार

आजारापासून मुक्त राहण्यासाठी योग्य आहार घेणं गरजेचं आहे. आहार सकारात्मक बदल केल्याने मानसिक ताणतणाव कमी  होतो. त्यामुळे रोजच्या जेवणात ताजी फळं, भाज्या, दूध, पनीर , कडधान्य यांचा समावेश करा. 

व्यायाम करा

(Image credit- KUTV) 

दररोज व्यायाम केल्याने शरीर लवचीक राहील, त्यामुळे लठ्ठपणा उद्भवणार नाही. कारणं  वजन वाढल्याने थायरॉईड होण्याचा धोका अधिक असतो.  

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स