शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; ३२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
2
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
3
आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२५ : आर्थिक लाभ, खोळंबलेली कामे...
4
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
5
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
6
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
7
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
8
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
9
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
10
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
11
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
13
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
14
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
15
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
16
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
17
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
18
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
19
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
20
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?

गर्भनिरोधक गोळ्या घेताय? तर असा होईल परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 15:49 IST

सध्याच्या काळात गर्भनिरोधक गोळ्या या कमी वयाच्या मुलीसुध्दा जास्त घेताना दिसतात.

सध्याच्या काळात गर्भनिरोधक गोळ्या या कमी वयाच्या मुलीसुध्दा जास्त घेताना दिसतात. बदलती जीवनशैली आणि राहणीमानाच्या पद्धतीत झालेल्या बदलामुळे या गोळ्या सर्वाधिक घेतल्या जातात. तुम्ही गर्भनिरोधक गोळीचे सेवन करण्याआधी जर कसलाही विचार करत नसाल तर ही गोष्ट फार महागात पडू शकते. 

अशा भरपूर स्त्रिया आहेत ज्या गर्भधारणा रोखण्यासाठी (contraceptive pills) गर्भनिरोधक गोळ्या घेतात. पण त्या स्त्रिया गर्भनिरोधक गोळ्यांच्या सेवनाने होणाऱ्या परिणामांबद्दल गाफिल असतात. मासिक पाळीशी संबंधित समस्या या गोळ्याचं सेवन केल्यामुळे अधिक उद्भवतात. जाणून घ्या गर्भनिरोधक गोळ्यांचे परिणाम काय होतात.

१) हार्मोंन्सचे संतुलन बिघडणे

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जर तुम्ही गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन केलं तर शरीराचं मोठं नुकसान होऊ शकतं. एका रिसर्चनुसार गर्भनिरोधक गोळ्यांमुळे शरीरातील हार्मोन्सच संतुलन राहत नाही. त्यामुळे महिलांच्या मेंदुवर सुध्दा परिणाम होऊ शकतो.

२) वजन वाढते

या गोळ्यांमुळे फॅट असलेल्या पेशींचे प्रमाण वाढत नाही परंतु त्यांचा आकार वाढतो. तसेच या गोळ्यांच्या सेवनामुळे काही महिलांच्या छातीमध्ये आणि मागच्या भागात पाणी झाल्याचे देखील आढळून आले आहे.  या गोळ्यांच्या सेवनाने मळमळणे , डोके दुखणे असे त्रास होऊ शकतात. वेगवेगळ्या गर्भनिरोधक गोळ्यांचे  वेगवेगळे परिणाम असू शकतात. त्यामुळे स्तन हळवे सुध्दा होऊ शकतात.

३) त्वचेच्या समस्या 

गर्भनिरोधक गोळ्याच्या सेवनाने त्वचेसंदर्भात तक्रारी वाढू शकतात मुरमं येणे, त्वचेवर पुळ्या येणे या समस्यांमध्ये वाढ होऊ शकते. त्वचेवर काळे डाग पडण्याची समस्या सुध्दा निर्माण होऊ शकते. 

४) पाळीची वेळ चुकणे 

या गर्भनिरोधक गोळ्यांच्या ३ महिने नियमित सेवनानंतर  गोळीच्या सेवनामुळे एकदा मासिकपाळी येऊन गेल्यावर दुसऱ्यांदा येणाऱ्या मासिकपाळच्या आधीच म्हणजे दोन मासिकपाळीच्या मधेच कधीतरी रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. 

५) केस गळणे

गर्भनिरोधक गोळ्यांच्या अति सेवनाने केस मोठ्या प्रमाणात गळू शकतात. तसंच केस पिकणे आणि मुळं कमजोर होणे. अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य