कोरोना विषाणूचं संक्रमण की सामान्य सर्दी ताप; दवाखान्यात न जाता कसं ओळखाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 05:50 PM2020-05-31T17:50:06+5:302020-05-31T17:59:11+5:30

फुफ्फुसांचे रोग, हृदयरोग, डायबिटिज यांसारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना धोका जास्त असतो.

Know the difference between covid 19 and commun flu heres how myb | कोरोना विषाणूचं संक्रमण की सामान्य सर्दी ताप; दवाखान्यात न जाता कसं ओळखाल?

कोरोना विषाणूचं संक्रमण की सामान्य सर्दी ताप; दवाखान्यात न जाता कसं ओळखाल?

googlenewsNext

कोरोनाच्या या माहामारीत लोकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ताप, अंगदुखी, सर्दी, खोकला, फ्लू या शारीरिक समस्यांची लक्षणं आणि कोरोना व्हायरसची लक्षणं काही प्रमाणात सारखीच असतात. अशा स्थितीत सामान्य ताप आहे की कोरोना हे कळणं खूपच अवघड असतं. आज आम्ही तुम्हाला घरबसल्या लक्षणांच्या आधारे  कोरोनाची लक्षणं आणि सामान्य फ्लू यातील फरक कसा ओळखायचा याबाबत सांगणार आहोत.

कोरोना व्हायरस वेगाने संपूर्ण जगभरात पसरत आहे. याची लक्षणं सुद्धा खूप सामान्य आहेत. यात रुग्णाला सुरूवातील सर्दी, खोकला, ताप येतो पुढील काही दिवसात श्वास घ्यायलाही त्रास होतो. फुफ्फुसांचे रोग, हृदयरोग, डायबिटिज यांसारख्या आजारांनीग्रस्त असलेल्या लोकांना धोका जास्त असतो. सध्या कोरोना व्हायरसवर कोणतंही औषध किंवा लस मिळालेली नाही. त्यामुळे सोशल डिस्टेंसिंग, मास्कचा वापर करून काळजी घ्यायला हवी. 

कोरोनाची लक्षणं

ताप किंवा थंडी वाजणे

घसा कोरडा पडणं

श्वास घ्यायला त्रास होणं

थकवा येणं

घश्यात वेदना

सुका खोकला

डोळे येणं

नाकाला संवेदना न जाणवणं

नाकातून सतत पाणी येणं, सायनस कंजेशन, ही कोरोनाची सामन्य लक्षणं आहेत. अशी लक्षणं तुम्हाला दिसत असतील तर स्वतःला क्वारंटाईन करा आणि सरकारने दिलेल्या गाईडलाईन्सचं पालन करा. तसंच डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासणी करा.

सामान्य सर्दी ताप

साधा सर्दी, ताप  लक्षणांकडे वेळीच लक्ष  द्यायला हवं. , थकवा जाणवणं, शिंका येणं, डोळ्यातून पाणी येणं, घसा खवखवणं, कमी तीव्रतेने होणारी डोकेदुखी अशी लक्षणं दिसून येतील. सामान्य ताप ३ ते ४ दिवसात संपतो.  जास्तीत जास्त आजार हे रोगप्रतिकारकशक्ती कमी असल्यामुळे होतात. सामान्य तापाशी लढण्यासाठी रोगप्रतिराकशक्ती चांगली असणं गरजेचं आहे.  त्यासाठी संतुलित आहार आणि पुरेशी झोप  घेणं महत्वाचं आहे.

सॅनिटायजर लावण्याचा काहीच उपयोग नाही; जर करत असाल 'या' ५ चुका, जाणून घ्या कोणत्या

संक्रमणापासून वाचवण्याऱ्या जिन्सला ब्लॉक करत आहे कोरोनाचा विषाणू; 'असे' होत आहेत परिणाम

Web Title: Know the difference between covid 19 and commun flu heres how myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.