शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

डायबिटीसशी निगडीत गैरसमज कसे कराल दूर?; जाणून घ्या डॉक्टरांनी दिलेला महत्वाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2020 15:09 IST

Health Tips In marathi : डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येकाची आहार घेण्याची पद्धत वेगवेगळी असते. खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा, शारीरिक स्थिती, अनुवांशिकता यामुळेही हा आजार होऊ शकतो. 

डायबिटीसचा आजार उद्भवल्यास रुग्णांला वेगवेगळ्या प्रकरची पथ्य पाळावी लागतात. सामान्य लोकांपेक्षा वेगळी जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करावा लागतो. कारण अनेकांना डायबिटीस  झाल्यानंतर या आजाराबाबत पूर्ण आणि योग्य माहिती नसते.  त्यामुळेच या आजाराबाबत असलेले गैरसमज दूर करणं गरजेचं आहे. जेणेकरून तुम्हाला स्वतःच्या आणि कुटूंबातील लोकांच्या  तब्येतीची काळजी घेता येईल. नोव्हेंबर महिन्यात वर्ल्ड डायबिटीस डे सिरीज असते. या दरम्यान डायबिटीसशी निगडीत माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाते. ऑस्ट्रेलियन डायबिटीज एज्युकेटर असोसिएशन मान्यता प्राप्त डायबिटीज विशेषज्ञ स्वाती बाथवाल यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे

डायबिटीसबाबत कोणते गैरसमज आहेत?

हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की, डायबिटीसबाबत लोकांच्या मनात कोणत्या प्रकारचे चुकीचे समज आहेत.  डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार डायबिटीस असलेल्या लोकांना कोणताही एक आहार नसतो. आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश असून डॉक्टरांच्या सल्ल्याने डाएट प्लॅन घ्यायला हवा. साखरेचं सेवन कमी प्रमाणात केल्यास डायबिटीसचा धोका नसतो किंवा साखरेचं सेवन कमी केल्यास  डायबिटीस होणार नाही असाही गैरसमज अनेकांच्या मनात असतो. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येकाची आहार घेण्याची पद्धत वेगवेगळी असते. खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा, शारीरिक स्थिती, अनुवांशिकता यामुळेही हा आजार होऊ शकतो. 

डायबिटीस असलेले लोक आपल्या आहारात वेगवेगळ्या  फळांचा समावेश करू शकतात. पण त्याचे प्रमाण ठरलेले असते. फळांमध्ये नैसर्गिक  शुगर असते. लीची आणि टरबूज या फळांचे सेवन जास्त केल्याने शरीरातील साखरेचं प्रमाण वाढू शकतो. म्हणून या फळांचे कमीत कमी प्रमाणात सेवन करायला हवे. डायबिटीस पूर्णपणे बरा होऊ शकतो की नाही. असाही प्रश्न लोकांना पडतो.

तज्ज्ञ स्वाती बथवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार टाइप-2 डायबिटीसने शरीरात प्रवेश केल्यानंतर पॅनक्रियाजमधून इन्सुलिन निघून जाते. डायबिटीस नियंत्रणात ठेवता येऊ शकतो. त्यासाठी  दररोज व्यायाम करायला हवा.   जीवनशैली चांगली असावी, जेवणाच्या तसंच खाण्यापिण्याच्या वेळा चुकवू नये.

फराळाचा आनंद घेताना डायबिटीस आणि वाढत्या वजनावर असं ठेवा नियंत्रण

जास्त न खाता प्रमाणात खा

जर तुम्हाला डायबिटीसची समस्या असेल तर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी एकाचवेळी खूप जास्त खाणं टाळा.  दिवसातून ३- ४ वेळा ठराविक वेळेचे अंतर ठेवून काहीतरी खात राहा. त्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होईल. याशिवाय शरीराला पोषक तत्व मिळतील. 

हेल्दी स्नॅक्स घ्या 

दिवाळीच्या वेळी मिठाई, पेठे खाण्यापासून रोखणं खूप कठीण असतं.  जर तुम्हाला डायबिटीसचा त्रास असेल तर कमीत कमी गोड पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा.  गोड खावंस वाटल्यास तुम्ही ताजी फळं खाऊ शकतं  तसंच जास्तीत जास्त पाणी प्या त्यामुळे त्वचा आणि शरीर हायड्रेट राहण्यास मदत होईल.

गोड कमी खा

डायबिटीस असलेल्या लोकांनी असलेल्या  दुधाच्या चॉकलेटऐवजी डार्क चॉकलेट खावे. वास्तविक, डार्क चॉकलेटमध्ये साखर कमी प्रमाणात असते, ज्याचा आरोग्यावर फारसा परिणाम होत नाही. गोड पेयांचे  सेवन करण्यापेक्षा शुगर फ्री पेय किंवा नारळाचे पाणी हा उत्तम पर्याय ठरेल. 

मास्क धुवून उन्हात सुकवल्याने ९९.९९ % व्हायरस नष्ट होतो? जाणून घ्या दाव्यामागचं सत्य

ब्राऊस राईस खा

अनेकांना पांढरा भात अधिक खायला आवडतं. कारण  रोजच्या जेवणाचा तो भाग असतो.  पण डायबिटीसच्या रुग्णांनी पांढरे तांदूळ खाणे टाळावे. कारण त्या तांदळामध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स जास्त असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीची वाढ होते. म्हणून पांढर्‍या तांदळाऐवजी ब्राऊस राईस खायला सुरूवात करा. दिवाळीच्या निमित्ताने या भाताचा आहारात समावेश केल्यास  रक्तातील साखर नियंत्रण राहील.

मोठा दिलासा! भारतातील बहुतेक लोकांना कोरोना लसीची गरज भासणार नाही?; एम्सच्या डॉक्टरांचा दावा

तळलेल्या पदार्थांचे अतिसेवन करू नका

दिवाळीनिमित्त विविध प्रकारचे तळलेले आणि मसालेदार पदार्थ तयार केले जातात. डायबिटीसच्या रुग्णांनी उत्सवाच्या वेळी , भजी, चकली यासारखे तळलेले पदार्थ खाऊ नयेत. याशिवाय, बिस्किट्स, केक यासारखे बेकरी पदार्थ पूर्णपणे टाळायला हवेत. जेणेकरून वजन वाढण्यापासून तसंच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्यापासून बचाव करता येऊ शकतो. याशिवाय मादत पदार्थाचे सेवन शारीरिक संतुलन बिघण्यासाठी  कारणीभूत ठरू शकतं. म्हणून  दारू, सिगारेट  अशा पदार्थाचे जास्त सेवन करू नका.  

टॅग्स :diabetesमधुमेहHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स