आपण ऑफिसमध्ये असताना किंवा घरात असताना जर कंटाळा आला असेल तर जांभया येतात. तसेच जर तुमची झोप पूर्ण झाली नसेल तरी सुद्धा जांभया येतात पण यापैकी काहीच कारण नसेल तरी फक्त आपल्या आजूबाजूचा एखादा व्यक्ती सतत जांभया देत असेल तरी आपल्याला येतात. तुम्ही कधी विचार केला आहे का की समोरच्या एखाद्या व्यक्तील बघून आपण जांभया का देतो. चला तर मग जाणून घेऊया काय आहे कारण.
मानसशास्त्रीय अहवालानुसार एकमेकांना पाहून जांभया देणं हे लोकांच्या भावनीक स्थीतीशी निगडीत असणारी गोष्ट आहे. पण २०१४ मध्ये या अहवालाचे खंडण करण्यात आले. The Duke Centre for Human Genome Variation ने २०१४ मध्ये एक अभ्यासपूर्ण संशोधन केले त्यानुसार वाढत्या वयात एकमेकांना बघून जांभया येण्याची शक्यता कमी होत जाते.
काही व्यक्ती हे जांभई देण्याच्या बाबतीत खूपच असंवेदनशील असतात. त्यांना कोणत्याही वातवरणात जांभई यायला वेळ लागतो. प्रत्येकाची शारीरिक स्थिती ही वेगवेगळी असते त्यामुळे प्रत्येकाला जांभया येण्याची कारणं वेगवेगळी सुद्दा असू शकतात. हृदय आणि फुफ्फुसांच्या आजारांमुळेदेखील जास्त जांभया येतात. जेव्हा हृदय आणि फुफ्फूसं योग्य काम करत नाही तेव्हा दम्याचा आजारही असू शकतो. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला पाहून जांभया देणं हे काही काळापूरता मर्यादित असते.