(Image Credit : CBHS Health Fund)

तुम्ही एंग्झायटीबाबत अनेकदा ऐकलं असेलच. पण तुम्हाला हे माहीत नसेल की, याकडे दुर्लक्ष केल्याने डिप्रेशन आणि एंग्जायटी अटॅकचा धोका होऊ शकतो. एंग्जायटी म्हणजे चिंता ही कुणालाही, कोणत्याही गोष्टीमुळे होऊ शकते. काही लोकांना चारचौघात बोलण्याची एंग्जायटी म्हणजे टेन्शन असतं, तर मुलांमध्ये परिक्षेबाबत एंग्जायटी असते.

सामान्यपणे आपण एंग्जायटीला तेवढ्या गंभीरतेने घेत नाही, जेवढं घ्यायला पाहिजे. हेच कारण आहे की, तरूणांमध्ये एंग्जायटीचं प्रमाण वाढत आहे. केवळ तरूणच नाही तर आता तर लहान मुलांमध्येही एंग्जायटीची लक्षणे दिसणे सामान्य बाब झाली आहे. लहान मुलांमधील या लक्षणांना ढोबळमानाने चिंता किंवा उतावळेपणाचं नाव दिलं जातं.

एंग्जायटी अटॅक 

(Image Credit : Mission Harbor Behavioral Health)

एंग्जायटीकडे दुर्लक्ष केलं गेलं तर ही स्थिती एंग्जायटी अटॅकचं रूप घेऊ शकते. ही ती स्थिती आहे ज्यात व्यक्तीला सतत भीती असते की, काहीतरी वाईट किंवा चुकीचं घडणार आहे. ही स्थिती पॅनिक अटॅकपेक्षा वेगळी असते. पॅनिक अटॅकची लक्षणे एंग्जायटी अटॅकच्या तुलनेत अधिक घातक असतात. एंग्जायटी अटॅकमध्ये व्यक्तीला सतत चिंका, भीती आणि अस्वस्थता जाणवते. हृदयाची धडधड वाढते आणि श्वास भरून येतो. त्यामुळे एंग्जायटीकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांना संपर्क करून योग्य ते उपचार घ्यावे.

एंग्जायटीची लक्षणे

(Image Credit : The Conversation)

एंग्जायटीने पीडित व्यक्ती टेन्शन आणि भीतीमध्ये तर राहतो, सोबतच ती व्यक्ती दुसऱ्या लोकांपासून दूर राहू लागते. त्याला एकटं राहणं पसंत असतं आणि त्याच गोष्टींबद्दल जास्त विचार करतो ज्या गोष्टींमुळे त्याला दु:खं होतं. श्वास भरून येणे आणि हृदयाचे ठोके वाढणे याशिवाय एंग्जायटीने शिकार असलेल्या व्यक्तीला झोप येत नाही आणि ते रात्रभर जागे राहतात. 

काही वेगळी लक्षणे

सतत या लोकांच्या मनात नकारात्मक विचार सुरू असतात.

डोकं दुखतं आणि कोणत्याही कामात लक्ष लागत नाही.

डायरिया होतो आणि अनेक जांभई देऊ लागतात.

तोंड कोरडं पडतं आणि व्यक्ती बेशुद्ध होतो.

एंग्जायटीने ग्रस्त लोकांना काय करावे?

(Image Credit : NPR)

1) जर तुम्ही फार जास्त कॉफी पिण्याचे शौकीन असाल तर प्रमाण कमी करा. जास्त कॉफी प्यायल्याने हार्टबीट वाढतात आणि याने व्यक्तीला नर्व्हस वाटू लागतं. कॉफीचं जास्त सेवन केल्याने वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. जसे की, हातांना घाम येणे, कानात आवाज घुमणे आणि वेगाने हृदय धडधडणे.

२) अनियमित खाणं-पिणं यानेही एंग्जायटीची समस्या गंभीर रूप घेऊ शकते. अनेकजण सकाळचा नाश्ता करत नाहीत किंवा दिवसभरही काही खात नाहीत. काहीच न खाता अनेकजण झोपतात कंवा जंक फूड खाऊन झोपतात. या सर्व सवयी शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमजोर होते आणि सोबत एंग्जायटीचा स्तरही वाढतो. उपाशी राहिल्याने स्ट्रेस लेव्हल वाढते आणि ब्लड शुगरचं प्रमाण कमी होतं. याने एंग्जायटीची समस्या होते.

३) एंग्जायटीने ग्रस्त अनेक लोक रात्री उशीरापर्यंत झोपत नाही आणि तणाव आणखी वाढू देतात. हा वाढलेला तणाव त्यांची राहिलेली झोपही उडवतो. नंतर हा तणाव दिवसाही तुमचा पिच्छा सोडत नाही. त्यामुळे रात्री जास्त उशीरापर्यंत जागू नका. लाइफस्टाईलमध्ये बदल करा.


Web Title: Know anxiety symptoms and causes, Ignoring it can lead to anxiety attack
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.