(Image Credit : lehmiller.co)
कीगल एक्सरसाइज (Kegel Exercises) ची चर्चा तुम्ही नेहमीच ऐकली असेल. जेव्हा एखाद्या महिला किंवा पुरूषाला लघवीचा प्रवाह रोखण्यास अडचण येते तेव्हा या एक्सरसाइजचा विषय निघतो. पेल्विक(ओटीपोट) फ्लोरमध्ये रक्तप्रवाह कमी झाल्यास आणि पेल्विक मांसपेशींमध्ये कमजोरी आल्यावर कीगल एक्सरसाइज करण्याचा सल्ला दिला जातो. Kegel Exercises महिलांसाठी अधिक फायदेशीर मानली जाते.
एक्सपर्ट सांगतात की, कीगल एक्सरसाइज (Kegel Exercises) अशी एक्सरसाइज आहे जी प्रत्येक वयातील महिला आणि पुरूषांनी करावी. पेल्विक फ्लोरच्या मांसपेशींमध्ये कमजोरी आल्यावर लघवीचा प्रवाह रोखण्याची क्षमता कमजोर होते. ही समस्या महिलांमध्ये अधिक बघायला मिळते.
जास्तीत जास्त केसेसमध्ये असं बघितलं जातं की, महिलांमध्ये पेल्विक फ्लोरमध्ये कमजोरी आल्याने गर्भावस्था, डिलिव्हरीनंतर, वय वाढल्या कारणाने, पोटाची सर्जरी झाल्यानंतर अधिक त्रास होऊ लागतो.
कीगल एक्सरसाइज कशी करतात?
Kegel Exercises ला अमेरिकन स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. अर्नोल्ड एच कीगल यांचं नाव देण्यात आलं आहे. डॉ. अर्नोल्ड एच कीगल यांनी ऑपरेशन टाळण्यासाठी या एक्सरसाइजचा शोध लावला होता. त्यांनी कीगल पेरिनेमीटरचा देखील शोध लावला होता. याने पेल्विक फ्लोरच्या मांसपेशींची मजबूती आणि क्षमता मोजली जाते.
कुणाला होते ओटीपोटाच्या समस्या
१) वाढत्या वयामळे
२) वजन जास्त असल्याने, खासकरुन पोट जास्त वाढल्याने
३) स्त्री रोगाची एखादी सर्जरी झाली असेल तर
४) पुरुषांमध्ये प्रोस्टेट सर्जरी झाल्यावर
५) मानसिक काही आजार झाल्याव किंवा तंत्रिका तंत्र संबंधी आजार झाल्यावर यूरिन लिकेजची समस्या होते.
कीगल एक्सरसाइजचे फायदे
१) कीगल एक्सरसाइज गर्भाशय, मूत्राशय आणि मोठ्या आतड्यांखालील मांसपेशींना मजबूत करते.
२) ही एक्सरसाइज महिला आणि पुरूष दोघांसाठीही फायदेशीर आहे. ज्यांना यूरिन लिकेजची समस्या असते त्यांच्यासाठीही फायदेशीर ठरते.
कधी आणि कुठे करावी कीगल एक्सरसाइज?
ही एक्सरसाइज कधीही आणि कुठेही केली जाऊ शकते. ही एक्सरसाइज तुम्ही बसून, झोपून आणि उभे राहून करू शकता. इतकेच नाही तर तुम्ही काही काम करत असताना देखील ही एक्सरसाइज करू शकता.
कीगल एक्सरसाइजचा फायदा तुम्हाला तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही योग्य मांसपेशींमध्ये तणाव निर्माण करता. जर तुम्ही योग्यप्रकारे ही एक्सरसाइज केली नाही तर तुम्हाला फायदाही होणार नाही.
तशी तर कीगल एक्सरसाइज एका खेळाप्रमाणे आहे. जसे की, तुम्हाला लघवी करताना अचानक लघवी रोखायची आहे. काही वेळ लघवी रोखून पुन्हा करायची आहे. पण जेव्हा तुम्ही हे करत असाल तेव्हा योग्य त्या मांसपेशीवर ताण देणे गरजेचे आहे.
महिलांनी कशी करावी ही एक्सरसाइज
१) तशी तर कीगल एक्सरसाइज एकाचप्रकारची असते. पण मांसपेशींमध्ये आकुंचन आणण्यासाठी महिलांना विशेष लक्ष देण्याची गरज असते.
२) महिला जेव्हा यूरिनेशन करतात तेव्हा थोडं थांबावं आणि व्हजायना, मूत्राशय व गुदा या अवयवांच्या भागाल टाइट करावं. जर असं होत असेल तर तुम्ही एक्सरसाइज योग्यप्रकारे केली समजावं.
३) त्याचवेळी मांड्या, पोट आणि स्तनांच्या मांसपेशींमध्ये टाइटनेस येऊ नये.
एक्सरसाइज करण्याचे नियम
१) आधी कीगल एक्सरसाइज करण्यासाठी शांत जागा निवडा.
२) जेव्हा तुम्ही कीगल मांसपेशी म्हणजेच पेल्विक फ्लोरची ओळख पटवाल तेव्हा ही एक्सरसाइज करा.
३) सर्वात चांगली वेळ यूरिन पास करतेवेळेची असते. कारण यावेळी यूरिन रोखून ठेवणे आणि करणे हे करू शकता.
४) एकदा कीगल मांसपेशींमध्ये ताण निर्माण झाला तर ५ सेकंदासाठी तसंच थांबांव. त्यानंतर पुन्हा ५ सेकंदाचा आराम घेऊन एक्सरसाइज पुन्हा करावी.
५) कीगल एक्सरसाइज करताना हे लक्षात घ्या की, पोट, कंबर आणि मांड्याच्या आजूबाजूच्या मांसपेशी टाइट होऊ नये.
६) ही एक्सरसाइज एकावेळी १० ते २० वेळा करू शकता.