दातांची निगा राखण्यासाठी वापरा 'या' टिप्स, म्हातारपणातही दात राहतील मजबूत...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 11:46 AM2021-07-27T11:46:36+5:302021-07-27T11:56:14+5:30

मनुष्याचा आहार, मनुष्याची पचनक्रिया, मनुष्याची भाषा, शब्दोच्चार या गोष्टीसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या दातच कारणीभूत ठरतात म्हणूनच दातांना महत्त्व मोठं आहे. अशावेळी दातांची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेणे फार महत्वाचे ठरते.

Keep your teeth strong and healthy, use these simple remedies and tips | दातांची निगा राखण्यासाठी वापरा 'या' टिप्स, म्हातारपणातही दात राहतील मजबूत...

दातांची निगा राखण्यासाठी वापरा 'या' टिप्स, म्हातारपणातही दात राहतील मजबूत...

googlenewsNext

कोणत्याही व्यक्तीच्या चेहऱ्यामध्ये ठळकपणे उठून दिसतात ते त्या व्यक्तीचे केस, डोळे, नाक आणि दात. या चारही घटकांपैकी केस, डोळे, नाक हे तिन्ही घटक सुंदर असले आणि दात मात्र वेडेवाकडे किंवा फारच पुढे असले तर मात्र बाकी सर्व घटक हजर असूनही वेड्यावाकड्या दातांमुळे चेहऱ्याला कुरुपता येते आणि निरनिराळ्या समस्यांना आमंत्रण मिळते. मनुष्याचा आहार, मनुष्याची पचनक्रिया, मनुष्याची भाषा, शब्दोच्चार या गोष्टीसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या दातच कारणीभूत ठरतात म्हणूनच दातांना महत्त्व मोठं आहे. अशावेळी दातांची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेणे फार महत्वाचे ठरते. डॉ. नम्रता रुपानी यांनी द हेल्थ साईट या वेबसाईटसा याची माहिती दिली आहे.

ब्रश करण्याची पद्धत
ब्रश करताना आपल्या दात आणि हिरड्या यावर कठोर होत दाबून कधीही ब्रश करू नका. ब्रश करण्याची एक सोप्पी पद्धत आहे ती म्हणजे, गोलाकार ब्रश करणे. ब्रश हा आडवा किंवा उभा फिरवण्याऐवजी गोलाकार पद्धतींने फिरवल्यास दातातील अडकलेले अन्नपदार्थ निघण्याची शक्यता जास्त असते. कायम लक्षात ठेवा की २ मिनिटे ब्रश करणे पुरेसे आहे.

जास्तीतजास्त पाणी प्या
जास्तीत जास्त पाणी पित राहिल्याने दातांवर होणारा आम्ल युक्त पदार्थांचा दुष्परिणाम टाळता येतो. कमी पाणी प्यायल्याने कमी लाळ बनते आणि ड्राय माऊथची समस्या निर्माण होते. वाढत्या वयासोबत ड्राय माऊथची समस्या असणे काही असामान्य नाही. औषधामुळेही ही समस्या उद्भवु शकते. यासाठी वेळीच डेन्टिस्टचा सल्ला घ्या.

डेंटिस्टकडे जा
तुम्ही दर सहा महिन्यांनी डेंटिस्टकडे गेले पाहिजे. डेंटिस्ट आपले दात साफ करतो व दाताचा कोणताही रोग नाही ना याची चिकित्सा करतो. कॅविटी, हिरड्यांचे दुखणे, तोंडाचा कर्करोग याची तपासणी तो करतो. तुम्ही डेंटीस्टला दर किती महिन्यांनी चेकअप करायचे हे ही विचारु शकता. जर तुम्हाला दाताच्या काही समस्या जाणवू लागल्या तर त्वरित डेंटिस्टकडे गेले पाहिजे.

फ्लॉश करा, माऊथवॉश वापरा
योग्य मार्गाने फ्लॉश केल्यामुळे दातांमधील अडकलेले अन्न कण निघून जाऊन दातांचे काढून वाढण्यास मदत होते. सध्या बाजारात अनेक प्रकारची (Mouth Wash) उपलब्ध असून Chlorhexidine असलेल्या माउथवॉश मुळे तोंडातील बॅक्टेरिया कमी होतात आणि दातांची कीड रोखण्यास मदत होते. परंतु माउथवॉश च्या अतिवापरामुळे दातांवर डाग येण्याची शक्यता असते. आपल्या दातांच्या डॉक्टर ने सुचवल्याशिवाय माउथवॉश न वापरलेले बरे, हे सुद्धा लक्षात ठेवा की माउथवॉश वापरणे हे ब्रश करण्यास पर्याय असू शकत नाही.

स्वस्थ जीवनशैली
गोड पदार्थ किंवा शितपेये टाळा. खासकरून जेवताना ही काळजी नक्की घ्यावी. आम्लपित्तयुक्त अन्न किंवा पेय पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच दात घासण्यापासून टाळा. अ‍ॅसिड मुळे दातांची झीज लवकर होते. गोड आणि चिकट अन्न, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ टाळा. हिरव्या पालेभाज्या, चीज, सुक्का मेवा, दूध, जीवनसाथ अ आणि क असलेली फळे खाल्ल्याने दात आणि हिरड्या निरोगी राहण्यास मदत होते.

Web Title: Keep your teeth strong and healthy, use these simple remedies and tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.