जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरला मारहाण रुग्णाच्या नातेवाईकाला केली अटक
By Admin | Updated: July 6, 2015 23:34 IST2015-07-06T23:34:22+5:302015-07-06T23:34:22+5:30
मुंबई: मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकाने तिथल्या डॉक्टरला शिवीगाळ केली, त्याचा गळा पकडला. नेत्रचिकित्सा विभाग प्रमुख आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनाही शिवीगाळ केल्याचा प्रकार सोमवारी दुपारी जे.जे. रुग्णालयात घडला. यानंतर रुग्णाच्या नातेवाईकाला पोलिसांनी अटक केली.

जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरला मारहाण रुग्णाच्या नातेवाईकाला केली अटक
म ंबई: मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकाने तिथल्या डॉक्टरला शिवीगाळ केली, त्याचा गळा पकडला. नेत्रचिकित्सा विभाग प्रमुख आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनाही शिवीगाळ केल्याचा प्रकार सोमवारी दुपारी जे.जे. रुग्णालयात घडला. यानंतर रुग्णाच्या नातेवाईकाला पोलिसांनी अटक केली. जे.जे.रुग्णालयात सोमवारी नेत्रचिकित्सा विभागात ६७ रुग्ण दाखल झाले. नेत्रचिकित्सा पुरूष वॉर्डमध्ये ४८ खाटा आहेत. जास्त रुग्ण आल्यामुळे काही रुग्णांना थांबण्यास सांगितले होते. ६ रुग्णांना जागा नसल्यामुळे जेवण, औषध देऊन बसण्यास सांगितले होते. यापैकी एकाच्या नातेवाईकाने डॉ. वफी अन्सारी यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. आम्हाला जागा द्या, काय चालले आहे, असे तो मोठ्या आवाजात बोलू लागला. जेव्हा डॉ. वफीने मी देतो, थोड शांत व्हा, सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा नातेवाईकाने त्याचा गळा पकडला. यानंतर नेत्रचिकित्सा विभाग प्रमुख डॉ. रागिणी पारेख वॉर्डमध्ये गेल्यावर त्यांना शिवीगाळ केली. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनाही शिवीगाळ केली. रुग्णाच्या नातेवाईकाने कशाप्रकारे डॉक्टराचा गळा पकडला, शिवीगाळ केली म्हणून त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली. नातेवाईकावर भादवि ३५३, ५०४, ५०६ आणि डॉक्टर संरक्षण कायदा २०१०, कायदा कलम ४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती डॉ. लहाने यांनी दिली.