​हिवाळ्यात जपा हृदयाला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 18:31 IST2016-12-23T18:31:40+5:302016-12-23T18:31:40+5:30

विशेषत: हिवाळ्यात रक्त घट्ट झाल्याने शरीरात रक्तप्रवाह सुरळीत होत नसतो त्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. अशा वेळी हिवाळ्यात हृदयाची काळजी घेणे अत्यावश्यक असते.

Japa heartache in winter! | ​हिवाळ्यात जपा हृदयाला!

​हिवाळ्यात जपा हृदयाला!

शेषत: हिवाळ्यात रक्त घट्ट झाल्याने शरीरात रक्तप्रवाह सुरळीत होत नसतो त्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. अशा वेळी हिवाळ्यात हृदयाची काळजी घेणे अत्यावश्यक असते. 
हिवाळ्यात उतरलेला पारा हा लहान मुले व वयोवृद्धांसाठी घातकच ठरतो. शिवाय उच्च रक्तदाब व हृदयरुग्णांसाठी देखील तितकीच घातक आहे. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी हिवाळ्यातील सगळ्यात मोठी समस्या म्हणजे घाम न येणे. यामुळे शरीरातील मिठाचे प्रमाण वाढते. मिठाचे प्रमाण वाढले की रक्तदाब वाढतो. 

काय काळजी घ्याल
* हिवाळ्यात पहाटे अधिक थंड वातावरण असल्याने हृदयरुग्ण व उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी सकाळच्या वेळी फिरणे टाळावे. त्याऐवजी संध्याकाळी फिरावे किंवा व्यायाम करावा. या रुग्णांनी घाम येईपर्यंत चालावे किंवा व्यायाम करावा.
* थंडीत शारीरिक हालचाल कमी झाल्यानेदेखील रक्तदाब वाढू शकतो. त्यामुळे हार्ट अटॅकची शक्यता वाढते. सर्दीत धमन्या आकुंचन पावतात. त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता वाढते. हृदयरुग्णांसाठी ही धोक्याची घंटा आहे. म्हणून हिवाळ्यात हृदयरोग्यांनी तेलकट खाद्यपदार्थांपासून दूर राहणे गरजेचे आहे. 
* उच्च रक्तदाब व हृदयरुग्णांना सात ते आठ तासांची झोप आवश्यक आहे. हिवाळ्यात शरीर व कान गरम कापडाने झाकून ठेवा. थोडेसे दुर्लक्ष चिंतेचे कारण ठरु शकते. 

Web Title: Japa heartache in winter!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.