शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
4
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
5
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
6
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
7
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
8
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
9
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
10
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
11
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
12
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
13
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
14
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
15
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
16
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
17
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
18
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
19
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
20
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

डायबिटीसच्या रूग्णांसाठी कसा फायदेशीर ठरतो फणस?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 11:25 IST

असेही अनेक पदार्थ किंवा फळं आहेत जे खाऊन लोक त्यांचं ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवू शकतात. असंच एक फळ म्हणजे फणस.

डायबिटीसच्या रूग्णांना त्यांच्या आहाराबाबत फार काळजी घ्यावी लागते. कारण चुकीचं काहीही खाल्लं गेलं तर त्यांची शुगर वाढू शकते, जे त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. पण असेही अनेक पदार्थ किंवा फळं आहेत जे खाऊन लोक त्यांचं ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवू शकतात. असंच एक फळ म्हणजे फणस. फणस खाऊन डायबिटीसचे रूग्ण त्यांचं ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेऊ शकतात.

लो ग्लायसेमिक इंडेक्स

फणसात कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतं, म्हणजे यात ब्लड ग्लूकोजचं प्रमाण प्रभावित करणारे कार्बोहायड्रेट्स कमी प्रमाणात असतात. त्यामुळे अनेकजण फणसाला डायबिटीसच्या रूग्णांसाठी सेफ मानतात. कारण याने शुगर लेव्हल अचानक वाढण्याचा धोका नसतो.

जास्त फायबर

फणसामध्ये फायबरचं प्रमाण फार जास्त असतं. फायबरमुळे पटचही हळू होतं, त्यामुळे रक्तातील शुगरचं प्रमाण अचानक वाढत नाही. या कारणाने फणसाच्या या क्वॉलिटी डायबिटीस रूग्णांसाठी शुगरचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास फार फायदेशीर ठरतात. तेच फास्ट फूड शरीर लवकर पचवतं. ज्यामुळे शुगरचं प्रमाण वेगाने वाढू लागतं. अशात फास्ट फूडपासून दूर राहणं डायबिटीसच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरतं. 

प्रोटीनचं प्रमाण अधिक

फणसामध्ये फायबरसारखंच प्रोटीनचं प्रमाण देखील अधिक असतं. एका रिपोर्टनुसार, प्रोटीन खाल्ल्याने रक्तातील शुगरचं प्रमाण अचानक वाढणं थांबवलं जातं. त्यामुळेही फणस खाण्याचा डायबिटीसच्या रूग्णांना मोठा फायदा होतो.

फणसाच्या पानांचा रस

(Image Credit : Sweat)

केवळ फणसच नाही तर याची पाने देखील डायबिटीसच्या रूग्णासाठी फायदेशीर मानली जातात. फणसाच्या पानांचा रस प्यायल्यास लगेच आणि जास्त काळासाठी ब्लड शुगर नियंत्रित करण्यास मदत मिळते.

कच्च फणस जास्त फायदेशीर

असे मानले जाते की, पिकलेल्या फणसापेक्षा कच्च फणस जास्त फायदेशीर ठरतं. हे तुम्ही भाजीच्या स्वरूपात खाऊ शकता किंवा वेगळ्या प्रकारेही खाऊ शकता.

(टिप : वरील लेखातील सल्ले हे केवळ माहिती म्हणून देण्यात आले आहेत. हे फॉलो करण्यापूर्वी तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. कारण काहींना याची अ‍ॅलर्जी असू शकते. त्यामुळे फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं. ते टाळण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं ठरतं.)

टॅग्स :diabetesमधुमेहHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य