शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
2
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
3
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
5
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
6
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
7
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
8
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
9
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
10
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
11
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
12
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?
13
एकावर एक बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; सोबत डिविडंडही मिळणार; गुंतवणुकदारांना दुप्पट फायदा
14
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
15
८८२ कोटींचा खर्च, २०२८ मध्ये होणार पूर्ण; ८ ऑगस्टला सीतामातेच्या जानकी मंदिराचे भूमिपूजन
16
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
17
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
18
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
19
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
20
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट

Interval Walking : वजन कमी करण्यासाठी इंटरवल वॉकिंग ठरते अधिक फायदेशीर, जाणून घ्या करण्याची योग्य पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 12:39 IST

Interval Walking For Weight Loss : इंटरवल वॉकिंगमध्ये तुम्हाला घाईघाईने चालायचं असतं, जेणेकरून जास्तीत जास्त फॅट बर्न करता यावं आणि वेगाने वजन कमी व्हावं.

Interval Walking For Weight Loss : काही लोकांचं वजन वॉक करून कमी होत नाही आणि मग हे लोक वॉक करणं बंद करतात. जर तुमच्यासोबतही असंच काही झालं असेल तुमच्यासाठी इंटरवल वॉकिंग फायदेशीर ठरू शकते. इंटरवल वॉकिंगमध्ये तुम्हाला घाईघाईने चालायचं असतं, जेणेकरून जास्तीत जास्त फॅट बर्न करता यावं आणि वेगाने वजन कमी व्हावं. या वॉकिंग दरम्यान शरीराला अनेक इंटरवल म्हणजे ब्रेक दिले जातात आणि प्रत्येक ब्रेकचा एक निर्धारित वेळ असते.

इंटरवल वॉकिंग केल्याने शरीर जास्त थकत नाही आणि रिकव्हरही लवकर होतं. या इंटरवल म्हणजे ब्रेक दरम्यान तुम्ही नॉर्मल ब्रीदिंग करता, ज्याने तुम्हाला फिटनेसचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सोपं जातं.  याप्रकारे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर इंटरवल ट्रेनिंग बेस्ट पर्याय ठरू शकतो.

पहिला टप्पा

हे सुरू करण्यासाठी तुम्ही स्मार्टवॉच किंवा स्टॉप वॉचचा प्रयोद केला तर तुम्हाला वॉक आणि ब्रेक योग्य प्रकारे करण्यास मदत मिळेल. सर्वातआधी ५ मिनिटे वार्म अप वॉक करा. या ५ मिनिटांमध्ये तुम्ही हळू चला, ज्याने तुम्हाला जास्त थकवा होणार नाही. असं केल्याने बॉडी गरम होते आणि मसल्स पुल होणार नाहीत. यानंतर ठरवा की, एका मिनिटात जवळपा १०० पावलं चालावी. यादरम्यान तुम्ही मोठा श्वास घेत रहा. पण याची काळजी घ्या की, तुमचा श्वास नॉर्मल असावा.

दुसरा टप्पा

वार्मअपनंतर आपला पहिला इंटरवल सुरू करा. जर तुम्ही पहिल्यांदाच हे करत असाल तर ३० सेकंदाचा इंटरवल ठेवा. यावेळी चालताना छोटी छोटी पावलं टाका आणि पूर्ण जोर लावून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. आपले हातही वेगाने पुढे आणि मागे करा. इथे तुमचा श्वास थोडा थोडा भरून येईल. ३० सेकंदानंतर नॉर्मल वॉकिंगवर परत या आणि २.३० मिनिटांपर्यंत तसाच वॉक करा. अशाप्रकारे पूर्ण ५ इंटरवल करा.

तिसरा टप्पा

अशाप्रकारे जर तुम्ही अर्धा तास वर्कआउट प्लान करत असाल तर सुरूवातीला ५ मिनिटं वार्मअप करा, ५ ते ७ मिनिटं वेगाने चला, ७ ते ८व्या मिनिटाला हलका वॉक, ८ ते १०व्या मिनिटाला जेवढ्या वेगाने चालू शकला तेवढ्या वेगाने चला. नंतर १० ते ११ व्या मिनिटाला स्लो वॉक करा. यानंतर ११ ते १३व्या मिनिटाला वेगाने चला.  नंतर पुन्हा १३ ते १४ व्या मिनिटाला हलका वॉक करा. असे ५ इंटरवल वॉक करा. 

(टिप - हे सल्ले किंवा सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. हे करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.) 

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स