शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये वाढलेलं वजन कमी करण्यासाठी घरच्याघरी करा 'ही' सोपी योगासनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 15:32 IST

तुम्हालाही पायऱ्या चढताना धाप लागते किंवा खाली वाकताना त्रास होत असेल ही चिंतेची बाब आहे.  कारण सध्या लॉकडाऊनमुळे अनेकांना वजन वाढण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो.

आज वजन वाढण्याची आणि लठ्ठपणाची समस्या जगभरात वेगाने पसरत आहे. चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि चुकीची लाइफस्टाईल यामुळे वयस्कर लोकांनाच नाही तर तरूणांना सुद्धा वजन वाढण्याची समस्या होऊ लागली आहे. तुम्हालाही पायऱ्या चढताना धाप लागते किंवा खाली वाकताना त्रास होत असेल ही चिंतेची बाब आहे.  कारण सध्या लॉकडाऊनमुळे अनेकांना वजन वाढण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो.

वजन वाढल्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. कारण सुस्तपणा शरीराला आलेला असतो. आळसही जास्त येतो.  शरीर बेढब दिसत असेल तर अनेकांना नैराश्याचा सामना करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्याचे काही सोपे योगाचे प्रकार  सांगणार आहोत. त्यामुळे घरच्याघरी आपलं वाढलेलं वजन कमी करू शकता. हे सोपे योगाचे प्रकार तुम्ही कोणतंही साहित्य उपलब्ध नसतानाही करू शकता. त्यामुळे आजारांशी लढण्यासाठी तुमची रोगप्रतिकारकशक्ती सुद्धा चांगली राहू शकते. 

१) सूर्य नमस्कार

(Image Credit : readoo.in)

वजन कमी करण्यासाठी सूर्य नमस्कार फार प्रभावी असतो. यात १२ आसने असतात, ज्याचा संपूर्ण शरीरावर प्रभाव पडतो. सूर्य नमस्कार केल्याने मान, फुप्फुसं आणि मांसपेशी मजबूत होतात. तसेच ही आसने नियमित केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी देखील नष्ट होते. त्यामुळे वजन कमी होतं.

२) भुजंगासन

(Image Credit : Finess Yoga)

हे आसन करून शरीरात ऑक्सिजन अधिक जातं. अर्थातच त्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. हे आसम दिवसभरातून १० वेळा केलं जाऊ शकतं. या आसनामुळे कंबर आणि पोटाच्या खालच्या भागात जमा झालेली चरबी सुद्धा दूर केली जाऊ शकते.

३) धनुरासन

या आसनामुळे वजन कमी होण्यासोबतच मांड्या, छाती आणि स्तनातील अतिरिक्त चरबी सुद्धा दूर होते. या आसनाने शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांचं वजन कमी करता येतं. हे आसन केल्याने पोटावर ताण येतो आणि लवचिकपण निर्माण होतो.

४)त्रिकोणासन

(Image Credit : FashionLady)

वेगवेगळे प्रयत्न करूनही तुम्ही जर वजन कमी करू शकले नसाल तर आता त्रिकोणासन करून बघा. हे आसन नियमितपणे केल्याने तुम्ही सहजपणे कॅलरी बर्न करू शकता. याने वजन कमी करण्यास मदत मिळते. जर हे आसन वेगाने केलं तर फायदा लवकर होतो.

५) वीरभद्रासन

(Image Credit : Yoga Journal)

हे आसन केल्याने मांड्या, पोट आणि स्तनांवरील चरबी कमी होते. इतकेच नाही तर यान शरीराची आतंरिक शक्तीही वाढते. ज्यामुळे तुम्हाला अधिक काळासाठी शक्ती मिळते. या आसनामुळे तुमचे हात, खांदेही मजबूत होतात. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर हे आसन नियमितपणे करा.

(टिप : वरील योगाभ्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानेच करावा. कारण योगाभ्यास करताना काही नियम पाळणे गरजेचे आहे. ते पाळले गेले नाही तर तुम्हाला त्रास होऊ शकतो.)

मोठा दिलासा! अखेर कधीपर्यंत तयार होणार कोरोनाची लस; WHOच्या तज्ज्ञांनी दिले उत्तर 

लक्षणं दिसत नसलेल्या कोरोना रुग्णांच्या फुफ्फुसांचं होतंय नुकसान; संशोधनातून खुलासा

टॅग्स :International Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिनYogaयोगHealthआरोग्यWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स