सार्वजनिक स्वच्छतागृहांची माहिती आता गुगल मॅप्सवर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 18:18 IST2016-12-23T18:18:57+5:302016-12-23T18:18:57+5:30
स्वच्छ भारत अभियानाला चालना मिळण्यासाठी गुगलने पुढाकार घेत ‘पब्लिक टॉयलेट्स’ अर्थात सार्वजनिक स्वच्छतागृहांची माहिती देणारे फीचर सुरुवातीला दिल्ली व मध्यप्रदेशात लॉन्च केले आहे.

सार्वजनिक स्वच्छतागृहांची माहिती आता गुगल मॅप्सवर!
स वच्छ भारत अभियानाला चालना मिळण्यासाठी गुगलने पुढाकार घेत ‘पब्लिक टॉयलेट्स’ अर्थात सार्वजनिक स्वच्छतागृहांची माहिती देणारे फीचर सुरुवातीला दिल्ली व मध्यप्रदेशात लॉन्च केले आहे. गुगलने केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाशी करार करून देशभरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची माहिती गुगल मॅप्सवर देण्याची घोषणा केली आहे. या माध्यमातून कुणीही नजीकच्या स्वच्छतागृहांची माहिती अगदी सुलभपणे मिळवू शकतो. यातील पहिल्या टप्प्यात दिल्ली एनसीआर म्हणजेच नवी दिल्लीसह नोयडा, गाझियाबाद, फरीदाबाद आदींसह मध्यप्रदेशातील भोपाळ आणि काही भागांमधील पब्लिक टॉयलेटसची माहिती आता गुगल मॅप्सवर दिसणार आहे. ही माहिती इंग्रजी आणि हिंदी भाषेत असेल. येत्या काही दिवसांमध्ये देशाच्या अन्य भागातील माहितीदेखील याच पध्दतीने देण्यात येणार असल्याचे आज गुगलतर्फे जाहीर करण्यात आले आहे.