शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

खुशखबर! भारतीय महिला शास्त्रज्ञानं तयार केली कोरोनाची लस; लवकरच चाचण्यांना सुरूवात होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2020 5:13 PM

२०१७ मध्ये स्पाईबायोटेक कंपनीची निर्मीती करण्यात आली होती. आता या कंपनीकडून कोरोना विषाणूंची लस तयार केली जात  आहे. 

ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतील भारतीय प्राध्यापक सुमी विश्वास यांनी कोरोना विषाणूंची लस तयार केली आहे. bloomberg.com च्या रिपोर्टनुसार  जगभरातील सगळ्यात मोठी लस उत्पादक कंपनी सिरम इंडिया इंस्टिट्यूटशी भागिदारी करून या लसीच्या मानवी चाचणीला ऑस्ट्रेलियामध्ये सुरूवात झाली आहे. प्राध्यापक सुमी विश्वास यांनी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतील जेनर इंस्टिट्यूमध्ये प्राध्यापक एड्रियन हिल आणि सारा गिलबर्ट यांच्यासह काम केले आहे. प्रोफेसर एड्रियन हिल आणि सारा गिलबर्ट यांच्यामार्फत तयार करण्यात आलेली लस पहिल्या टप्प्यात पोहोचली आहे. २०१७ मध्ये स्पाईबायोटेक कंपनीची निर्मीती करण्यात आली होती. आता या कंपनीकडून कोरोना विषाणूंची लस तयार केली जात  आहे. 

स्पाईकबायोटेक कंपनीचे कोरोना लसीचे मानवी परिक्षण ऑस्टेलियामध्ये सुरू आहे. ऑक्सफोर्डच्या प्राध्यापक आणि कंपनीचे सीईसो सुमी विश्वास यांनी सांगितले की दोन्ही टप्प्यातील ट्रायल दरम्यान शेकडो लोकांना लसीचे डोज दिले जाणार आहेत. नवीन कोरोना लसीत हेपेटायटिस बी एंटीजेन व्हायरसच्या कणांना वाहकांप्रमाणे वापरलं जात आहे.  या व्हायरसचे प्रोटीन्स कोरोना व्हायरसच्या स्पाईक प्रोटीन्सशी जुळलेले आहेत. 

याद्वारे शरीरात रोगप्रतिकारकशक्ती विकसीत केली जाणार आहे. सुमी विश्वास यांनी ऑक्सफोर्डमधून पीएचडीची  पदवी घेतली आहे. जेनर इंस्टीट्यूट सोबत मलेरियाची लस तयार करण्यासाठी  १ वर्ष काम केलं आहे. बँगलोर युनिव्हर्सिटीत मायक्रोबायोलॉजीचा अभ्यास केल्यानंतर २००५ मध्ये सुमी विश्वास या ब्रिटनला गेल्या. SpyBiotech ने सीरम इंस्टीट्यूटसोबत भागिदारी केली आहे.  सीरम इंस्टीट्यूट  आता एक अब्ज लसीचे डोज तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. जवळपास १९.८ मिलियन फंडिग जमा करण्यात आली आहे. 

जगातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ४० टक्के रुग्ण सापडताहेत भारतात

दरम्यान कोरोनाच्या संसर्गामुळे देशातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक बिघडत चालली आहे. देशात सापडणाऱ्या कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये दिवसागणिक झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान, रविवारी जगभरात सापडलेल्या कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी तब्बल ४० टक्के रुग्ण एकट्या भारतात सापडले आहेत. तसेच भारतानंतर सर्वाधिक कोरोनाबाधित असलेल्या अमेरिका आणि ब्राझील या दोन देशांमध्ये सापडलेल्या नव्या रुग्णांची एकत्रित आकडेवारीही भारतापेक्षा कमी आहे.दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे सोमवारी देशात सापडलेल्या कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या घटून ७४ हजार ९६० झाली आहे. मात्र सोमवारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा वाढून ११२५ झाली. देशात एका दिवसात झालेले हे सर्वाधिक मृत्यू आहेत. देशात आतापर्यंत कोरोनामुळे ७२ हजार ७२५ जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी भारतात तब्बल ९४ हजार रुग्ण सापडले होते. तर शनिवारीसुद्धा देशात जवळपास एवढेच रुग्ण सापडले होते. याचा अर्थ सरलेल्या आठवड्याच्या अखेरीस भारतात सुमारे १ लाख ८४ हजार नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे.

हे पण वाचा-

भय इथले संपत नाही! भारतात लहान मुलांमध्ये दिसलं कोरोनाचं घातक रुप, 'ही' आहेत लक्षणं

रोजच्या आहारात भाताचा समावेश करणं ठरू शकतं डायबिटीस, हृदयरोगाचं कारण; वेळीच सावध व्हा

दिलासादायक! कोरोनाच्या लढाईत भारताला रशियाची साथ; पुढच्या महिन्यात लसीच्या चाचणीला सुरूवात

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यIndiaभारतCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या