रोजच्या आहारात भाताचा समावेश करणं ठरू शकतं डायबिटीस, हृदयरोगाचं कारण; वेळीच सावध व्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 11:38 AM2020-09-08T11:38:09+5:302020-09-08T11:43:17+5:30

रोज भात जास्त प्रमाणात खाल्यानं तुम्ही जीवघेण्या आजारांना निमंत्रण देऊ शकता.

Eating rice everyday may be the cause of heart disease risk and cardiovascular disease | रोजच्या आहारात भाताचा समावेश करणं ठरू शकतं डायबिटीस, हृदयरोगाचं कारण; वेळीच सावध व्हा

रोजच्या आहारात भाताचा समावेश करणं ठरू शकतं डायबिटीस, हृदयरोगाचं कारण; वेळीच सावध व्हा

Next

भारतात गव्हानंतर सगळ्यात जास्त वापर तांदळांचा केला जातो.  वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार करण्यासाठी भाताचा वापर केला जातो.  रोजच्या  जेवणात डाळ भात, मसालेभात, बिर्यानी, खीर, पुलाव किंवा इतर पदार्थांमध्ये तांदळाचा वापर सर्वाधिक केला जातो. भात खाल्याशिवाय अनेकांचे जेवण पूर्ण होत नाही. रोजच्या जीवनाचा भाग म्हणून आहारात तांदळाचा समावेश केला जातो.  पुर्वीच्या काळी रोज भात खाण्याची सवय असणं हे ठिक होतं. सध्याची जीवनशैली पाहता  रोज भात जास्त प्रमाणात खाल्यानं तुम्ही जीवघेण्या आजारांना निमंत्रण देऊ शकता. भात खाल्यानं शरीरातील अवयवांवर कसा परिणाम होतो. याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

भात आपल्या रोजच्या जीवनाच भाग आहे. आरोग्याला भाताच्या सेवनानं अनेक फायदे होत असेल तरी जास्त प्रमाणात खाणं शरीरारासाठी नुकसानकारक ठरू शकतं. देशभरात डायबिटिस आणि  हृदयविकारांच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. हृदयविकाराचे  आणि डायबिटिसच्या रुग्णांवर करण्यात आलेल्या अभ्यासातून नवीन गोष्टी समोर आल्या आहेत. 

तांदळाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास शारीरिक स्वरुपात एक्टिव्ह राहता येत नाही. शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. पूर्वीच्याकाळी वाहतुकीची साधनं नसल्यामुळे लोक  कित्येक किलोमीटर पायी चालत जायचे. सध्या तुलनेने हालचाल फारशी होत नाही. त्यामुळे हृदयाचे आजार, कॉलेस्ट्रॉल वाढणं अशा समस्या उद्भवण्याचा शक्यता असते.

मॅनचेस्टर आणि सलफोर्ड युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांनी आपल्या संशोधनात दिलेल्या माहितीनुसार ज्या जागेवर शेतकरी भाताची शेत करतात त्या शेतीत आर्सेनिकचे प्रमाण जास्त असते. पूरस्थिती उद्भवल्यास आर्सेनिकचं प्रमाण वाढतं. आर्सेनिकमुळे इतर टॉक्सिन्ससोबत शरीरात  कार्डीओवॅस्क्यूलर आजार पसण्याचा धोका वाढतो.  रोज भात खात असलेल्या लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढते.  अशात  धुम्रपान केल्यानं हद्यरोग होण्याची संभावना जास्त असते. त्यासाठी  भाताचं सेवन करत असताना प्रमाणात करणं शरीराला चांगलं ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं. 

Image result for RICE

शिळा भात खात असाल तर जाणून घ्या नुकसान आणि फायदे

फर्मेंटेड प्रक्रिया शॉर्ट चेन फॅटी एसिड्स निर्माण करातात. त्यामुळे शरीरातील  दोन हार्मोन्स सक्रिय असतात, ग्लूकागन आणि पेप्टईट  जो तुमच्या भूकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त ठरत असतो,  पोटावरची चरबी कमी करण्यासाठी लठ्ठपणाविरोधक असलेल्या हार्मोन्सचे काम केले जाते, आपल्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा फायदेशीर असते, कॉलेस्टॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी शिळ्या भाताचे सेवन फायदेशीर ठरत असते.

शिळा आणि पुन्हा गरम केल्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता असते. ज्यामुळे पोटदुखी, उलटी होणे,  जुलाब होणे, अपचनाचा त्रास अशा समस्या निर्माण होण्याचा धोका असतो.  बेसिलस सेरेस हे सर्वसाधारणपणे मातीत तयार होणारा एक विषाणू आहे जो भातासुद्धा काहीवेळा तयार होत असतो. जो कच्च्या आणि शिळ्या भाताला दुषित करत असतो.  शिळ्या भाताचे सेवन वारंवार केल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमजोर होण्याचा धोका असतो. हा त्रास लहानांनाच नाही तर महिलांना आणि पुरूषांना  सुद्धा होत असतो.

हे पण वाचा-

कोरोनानंतर आता दुसऱ्या महामारीसाठी सज्ज राहावं; WHO चा जगातील देशांना इशारा

रोज बडीशोप घातलेलं दूध प्याल; तर आरोग्याच्या तक्रारींसाठी सतत दवाखान्यात जाणं विसराल

डास चावल्यानंतर खाज का येते? कोणत्याही ऋतूत 'या' ७ उपायांनी करा डासांपासून बचाव

Web Title: Eating rice everyday may be the cause of heart disease risk and cardiovascular disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.