शहरं
Join us  
Trending Stories
1
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
2
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
3
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
4
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
5
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
6
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
7
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
8
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
9
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
10
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
11
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
12
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
13
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
14
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
15
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
16
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
17
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
18
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
19
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
20
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर

चिंताजनक! कोरोना संसर्गामुळे भारतीयांना मृत्यूचा धोका जास्त, नव्या रिर्पोटने वाढवली चिंता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2020 17:42 IST

CoronaVirus News & Latest Updates : 'दि ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिक्स' (ONS) ने यावर्षाच्या सुरूवातील कोरोना व्हायरसच्या प्रभावाबाबत एक निष्कर्ष काढला होता. या आठड्यातील आकडेवारी पाहता ONS ने दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही आजार उद्भवणं हे राहणीमान आणि कामाचं स्वरूप यांवर अवलंबून असतं. 

जगभरात कोरोना व्हायरसने कहर केला आहे. कोरोना व्हायरसबाबत लंडनमध्ये एक सांख्यिकीय विश्लेषण करण्यात आले होते. यानुसार इंग्लंड आणि वेल्समध्ये राहत असलेल्या भारतीयांना कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूचा धोका  ५० ते ५७ टक्क्यांनी जास्त आहे. भारतीय पुरूष आणि महिलांमध्येही कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे मृत्यूचा धोका  जास्त आहे. 'दि ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिक्स' (ONS) ने या वर्षाच्या सुरूवातीला कोरोना व्हायरसच्या प्रभावाबाबत एक निष्कर्ष काढला होता. या आठड्यातील आकडेवारी पाहता ONS ने दिलेल्या माहितीनुसार कोणताही आजार उद्भवणं हे राहणीमान आणि कामाचं स्वरूप यांवर अवलंबून असतं. 

या रिपोर्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार सगळ्या समुदायात कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होत असलेल्या महिलांच्या तुलनेत पुरूषांचे प्रमाण जास्त आहे. चीनी लोक सोडता कृष्णवर्णीय नसलेल्या लोकांना मृत्यूचा धोका कमी असल्याचे यात नमुद करण्यात आले आहे. मागच्या विश्लेषणात ONS ने बांग्लादेश आणि पाकिस्तानमधील कोरोनाची आकडेवारी दिली होती. या रिपोर्टमधील माहितीनुसार बांग्लादेशमधील पुरूषांच्या तुलनेत पाकिस्तानातील पुरूषांमध्ये कोरोनामुळे मृत्यूचा धोका जास्त दिसून आला. ONS हेल्थ एंड लाइफ इवेंट्स विभागाचे प्रमुख बेन हम्बरस्टोरन यांनी सांगितले की, विशिष्ट जाती आणि अल्पसंख्याकांमध्ये मृत्यूदर अधिक दिसून आला. 

यात कृष्णवर्णीय आफ्रिकन, कृष्णवर्णीय कॅरेबियन, बांग्लादेशी आणि पाकिस्तानी  लोकांचा समावेश होता. ONS  हा रिपोर्ट रुग्णालयातील आकडेवारी आणि सर्वेक्षण यांवर आधारित आहे. डायबिटीस, हार्ट फेल्यूअर, प्री एंग्जिस्टिंग हेल्थ कंडीशन यांच्या आधारावर वेगवेगळ्या समुदायातील लोकांच्या मृत्यूदरबाबत माहिती मिळवली आहे. खुशखबर! रशियानं तयार केली कोरोनाची तिसरी प्रभावी लस, डिसेंबरपर्यंत मंजूरी मिळणार

या रिपोर्टनुसार तुम्ही कुठे राहता, कोणत्या क्षेत्रात काम करता यावर मृत्यूदर अवलंबून असतो. कामगार पक्षाचे  'विमिन एंड इक्वॉलिटीजच्या सेक्रेटरी मार्शा डी कॉर्डोवा यांनी सांगितले की,'' हा व्हायरस विनाशकारी असून कृष्णवर्णीय आफ्रिकन, कृष्णवर्णीय कॅरेबियन, बांग्लादेशी यांच्यावर वाईट परिणाम होत आहे. सरकारकडून काही समुदायांच्या मृत्यूंदराबाबत समीक्षा व्हायला हवी.'' अशी प्रतिक्रिया यांनी दिली आहे. WHO सह ८० शास्त्रज्ञांची धोक्याची सुचना; कोरोनापासून बचावासाठी 'हा' उपाय ठरतोय जीवघेणा

पहिल्या टप्प्यात देशातील ३० कोटी नागरिकांचे होणार लसीकरण

गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाची साथ नियंत्रणात येण्याचे संकेत मिळू लागले आहेत. दरम्यान, केंद्र सरकारनेही कोरोनाविरोधातील लसीकरणाची तयारी सुरू केली आहे. या लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये ३० कोटी नागरिकांना कोरोनाविरोधातील लस दिली जाईल.यामध्ये कोरोनाचा अधिक धोका असलेल्या लोकसंख्येसोबतच आरोग्य कर्मचारी, पोलीस, सॅनिटायझेशन कर्मचारी यांच्यासारख्याा फ्रंटलाइन वर्कर्सना लस दिली जाईल. पहिल्या टप्प्यात सुमारे ३० कोटी लोकांसाठी ६० कोटी लसी लागतील. कोरोनावरील लसीला मान्यता देण्यात आल्यानंतर लसीकरणाला सुरुवात केली जाईल. कोरोनाच्या लसीसाठी प्राधान्यक्रम ठरवण्यात आला असून, या प्राधान्यक्रमानुसार चार गट करण्यात आले आहे.

या गटांमध्ये सुमारे ५० ते ७० लाख हेल्थकेअर प्रोफेशनल्स, सुमारे दोन कोटी फ्रंटलाइन वर्कर्स, ५० वर्षांवरील वयोगटातील सुमारे २६ कोटी व्यक्ती आणि ५० वर्षांखालील कमी वयाच्या मात्र अन्य आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. कोरोनावरील लसीसाठी तयार करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या गटाने एक मसुदा तयार केला आहे. त्यासाठी केंद्रीय एजन्सी आणि राज्यांकडूनही इनपुट्स मिळाले होते. नीती आयोगाच्ये सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांच्या नेतृत्वाखालील या गटाने जी रणनीती आखली आहे त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये देशातील २३ टक्के लोकसंख्येला कोरोनाची लस देण्यात येईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यExpert Opinionतज्ज्ञांचा सल्ला