वंधत्व निवारणासाठी नवीन तपासणी तंत्रज्ञान ठरणार भारतात वरदान!
By Admin | Updated: March 3, 2016 01:57 IST2016-03-03T01:57:08+5:302016-03-03T01:57:08+5:30
पुणे : वंध्यत्त्वाच्या समस्येला तोंड देण्यासाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक उपचारपद्धती विकसित होत असताना त्यात नव्याने आणखीन एक भर पडली आहे. अपत्यहीन जोडप्यांना आशेचा किरण मिळावा यासाठी भारतात पहिल्यांदा पूर्वरोपण अनुवंशिक तपासणी सुविधा भारतात चालू झाल्याचे डॉ. देविका गुणशीला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

वंधत्व निवारणासाठी नवीन तपासणी तंत्रज्ञान ठरणार भारतात वरदान!
प णे : वंध्यत्त्वाच्या समस्येला तोंड देण्यासाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक उपचारपद्धती विकसित होत असताना त्यात नव्याने आणखीन एक भर पडली आहे. अपत्यहीन जोडप्यांना आशेचा किरण मिळावा यासाठी भारतात पहिल्यांदा पूर्वरोपण अनुवंशिक तपासणी सुविधा भारतात चालू झाल्याचे डॉ. देविका गुणशीला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सध्याच्या जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणात विवाहित दांपत्यांना वंधत्त्वाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. वारंवार होणारे गर्भपात, अनेकदा उपचार करूनही आणि आयव्हीएफनंतरही गर्भधारणेतील अपयशामुळे अनेक जोडपे त्रस्त आहेत. त्यावर हे उपचार उत्तम उपाय ठरणार आहेत. वंधत्त्व हा विषय अत्यंत नाजूक आणि गुंतागुंतीचा असल्याने अतिशय आव्हानात्मक आहे. मात्र, आता प्रत्येक अपत्यहीन जोडप्यांच्या चेहर्यावर हास्य आणण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात आल्याचे डॉ. गुणशीला यांनी सांगितले. या नव्या क्रांतिकारक तंत्रज्ञानाने गर्भाची तपासणी करून त्यातील गुणसूत्रांच्या कमतरतेवर उपचार केल्याने अपत्यहीन महिलेला आई होण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. पूर्वरोपण अनुवंशिक तपासणी (पीजीएस) हे आधुनिक आणि अद्यायवत तंत्रज्ञान असून गुणसूत्रातील कमतरता, त्यातील अडचणीचा शोध घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उपचार करता येते. जन्मदरात वाढ व्हावी आणि गर्भधारणेतील अडचणी दूर करणे हा आधुनिक तंत्रज्ञानाचा उद्देश असल्याचे डॉ. देविका गुणशीला यांनी सांगितले. या सुविधेमुळे वंधत्व, गर्भपाताची अडचण दूर होण्यास मदत होणार आहे. शिवाय, पैसा आणि वेळ वाचणार असल्याने सर्वसामान्यांना याचा फायदा होणार असल्याचे त्या म्हणाल्या.