मोहाडी रस्त्यावर स्वतंत्र महिला रुग्णालय जागा मिळाली : निधी अभावी काम होईना...

By Admin | Updated: March 15, 2016 00:35 IST2016-03-15T00:35:03+5:302016-03-15T00:35:03+5:30

जळगाव : जिल्हा रुग्णालयातील भार व कमी पडणारी जागा याला पर्याय म्हणून मोहाडी रस्त्यावर स्वतंत्र महिला व बालरुग्णालयासाठी जागा मिळाली आहे, मात्र निधी अभावी हे काम होत नसल्याचे चित्र आहे.

Independent women's hospital on Mohali road was given place: funds should not be used due to ... | मोहाडी रस्त्यावर स्वतंत्र महिला रुग्णालय जागा मिळाली : निधी अभावी काम होईना...

मोहाडी रस्त्यावर स्वतंत्र महिला रुग्णालय जागा मिळाली : निधी अभावी काम होईना...

गाव : जिल्हा रुग्णालयातील भार व कमी पडणारी जागा याला पर्याय म्हणून मोहाडी रस्त्यावर स्वतंत्र महिला व बालरुग्णालयासाठी जागा मिळाली आहे, मात्र निधी अभावी हे काम होत नसल्याचे चित्र आहे.
जिल्हा रुग्णालयात दिवसेंदिवस गर्दी वाढू लागल्याने जागा व खाटा कमी पडू लागल्या आहे. त्यामुळे महिलांसाठी स्वतंत्र शासकीय रुग्णालयाला मंजुरी मिळालेली आहे. मात्र कोणत्या न कोणत्या कारणाने हे काम मार्गी लागत नसल्याचे चित्र आहे. आता रुग्णालयासाठी मोहाडी रस्त्यावर जागा तर मिळाली आहे, मात्र निधी अभावी ते रखडले आहे.
दहा दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयातून एक महिन्याचे बाळ चोरीला गेले होते. त्या नंतर येथील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा समोर आला. येथे वाढती गर्दी व कमी पडणार्‍या जागेमुळे कोण येते व जाते हे लक्षात येत नाही. त्यामुळे महिला व लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र रुग्णालय हवे, हा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. तसेच जिल्हा रुग्णालयातील खाटांच्या क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण येऊ लागल्याने एकेका कॉटवर दोन-दोन रुग्ण टाकले जातात. यामुळे दुसरे रुग्णालय लवकर सुरू होणे गरजेचे झाले आहे.

१०० खाटांचे स्वतंत्र रुग्णालय...
प्रसूतीसाठी येणार्‍या महिलांची तसेच बालकांची सोय व्हावी म्हणून मोहाडी रस्त्यावर उभारण्यात येणार्‍या शासकीय रुग्णालयात १०० खाटांची सोय राहणार आहे. यामुळे प्रसूतीसाठी येणार्‍या महिलांची या रुग्णालयात सोय झाल्याने जिल्हा रुग्णालयातील भार कमी होण्यास मदत मिळणार आहे.

स्वतंत्र स्टाफ...
या रुग्णालयामध्ये १०६ जणांचा स्वतंत्र स्टाफ राहणार आहे. यामध्ये ४० नर्स, १८ डॉक्टर तसेच लिपिक व अन्य पदे मिळून वर्ग- १ ते वर्ग-४ असे १०६ जण येथे राहणार आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक समकक्ष पद....
या रुग्णालयासाठी स्वतंत्र वैद्यकीय अधीक्षकांचे पद राहणार असून ते जिल्हा शल्य चिकित्सक समकक्ष असणारे पद असेल.

निधी अभावी रखडले काम....
जागा तर मिळाली, येथे पदे कोणते व किती राहतील हे सर्व ठरले असले तरी निधी मिळत नसल्याने रुग्णालयाचे काम रखडले आहे. वरिष्ठ पातळीवरुन तांत्रिक मंजुरीत निधी अडल्याचे सांगितले जात आहे.

कोट...
प्रसूतीसाठी येणार्‍या महिला तसेच बालकांसाठी मोहाडी रस्त्यावर स्वतंत्र महिला रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जागादेखील मिळाली आहे.
-डॉ. किरण पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक.

Web Title: Independent women's hospital on Mohali road was given place: funds should not be used due to ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.