शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

झोपायचं तरी किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 09:41 IST

अन्न आणि झोप हे आपल्या जीवनशैलीचे अविभाज्य घटक आहेत.

डॉ. जलील पारकर, लीलावती रुग्णालय

अन्न आणि झोप हे आपल्या जीवनशैलीचे अविभाज्य घटक आहेत. ज्यांचे झोपेचे गणित बिघडते, त्यांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते, असे संशोधनाअंती स्पष्ट झाले आहे. भारतासह संपूर्ण जगात या विषयावर पुरेसे संशोधन झाले असून, पुरेशी झोप किती महत्त्वाची, हे अधोरेखित झाले आहे. ज्या व्यक्तीची झोप व्यवस्थित असते, तिचे आरोग्य उत्तम असल्याचे सर्वच जाणकारांचे मत आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी  कमीत कमी ६-७ तास झोप ते जास्तीत जास्त ८ तास झोपणे आवश्यक आहे.

नोकरीच्या ठिकाणी असलेल्या स्पर्धात्मक वातावरणामुळे गेल्या काही वर्षांत तरुणांच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाले आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म हेही झोपेचे वेळापत्रक बिघडविण्यासाठी कारण ठरत आहेत. कामामुळे किंवा सोशल मीडिया वा ओटीटी यांमुळे आजकालचे तरुण रात्र-रात्र जागे असतात. त्यामुळे झोपेच्या सवयीचा पॅटर्न बदलल्याचे दिसून येते. अनेक जण हव्या त्यावेळी झोपतात व हव्या त्यावेळी उठतात. झोप हा विषय एवढ्या सहजतेने घेऊन चालणे योग्य नाही. पुरेशी झोप हा गंभीर विषय आहे. 

‘स्लीप स्टडी’सारख्या  वैद्यकीय चाचण्या आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यांचा आधार घेऊन एखाद्या व्यक्तीची झोप किती आणि कशा पद्धतीने आहे याचा अभ्यास केला जातो. त्या व्यक्तीच्या अन्य व्याधीचे निदान या चाचणीतून निश्चित करून त्यावर उपचार केले जातात. वयोमानानुसार झोपेच्या सवयी बदलत जातात. अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या झोपेचा कालावधी कमी होतो, ते सहा तास झोपतात.

निद्रानाशाची व्याधी

झोप आणि मेंदूचा एकमेकांशी फार जवळचा संबंध आहे. त्यामुळे झोप अपुरी झाली तर मेंदूचे कार्य बिघडते. त्यामुळे चिडचिड वाढणे, दिवसा झोप येणे, स्मरणशक्ती मंदावणे, आदी परिणाम जाणवू लागतात. काहींना तर निद्रानाशासारख्या व्याधींना सामोरे जावे लागते. अशा व्यक्ती अनेकदा मानसिक तणावाखाली  असतात. अनेक जण झोप यावी म्हणून दारूच्या आहारी जातात. हेही घातकच. नैसर्गिक झोप ही महत्त्वाची आहे.

शरीर यंत्र नव्हे...

शरीर हे यंत्र नाही. दोन दिवस जागरण करून तिसऱ्या दिवशी झोप भरून काढू असे होत नाही. या पद्धतीने झोप भरून निघत नाही. दररोज पुरेसा व्यायाम केला पाहिजे. संतुलित आहार गरजेचे आहे. जंकफूड टाळा. कॅफिन, तत्सम पेय, अल्कोहोलच्या सेवनामुळे झोपेच्या कार्यात बिघाड निर्माण होऊ शकतात. झोपेची व झोपेतून उठण्याची  वेळ ठरलेली असावी. ज्या खोलीत झोपतो, तिथे इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा (टीव्ही, मोबाईल, आदी) वापर होणार नाही याची काळजी घ्यावी. 

टॅग्स :Healthआरोग्य