शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

‘इम्युनोथेरपी’ खातेय भाव, जागतिक कॅन्सर दिन विशेष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 11:57 IST

World Cancer Day : कर्करोगावरील उपचार म्हटले की डाेळ्यापुढे केमाेथेरपी, रेडिएशन आणि शस्त्रक्रिया हे उपचार प्रामुख्याने येतात. आता त्यात आणखी एका उपचाराची भर पडली आहे ती म्हणजे ‘इम्यूनोथेरपी’.

पुणे : कर्करोगावरील उपचार म्हटले की डाेळ्यापुढे केमाेथेरपी, रेडिएशन आणि शस्त्रक्रिया हे उपचार प्रामुख्याने येतात. आता त्यात आणखी एका उपचाराची भर पडली आहे ती म्हणजे ‘इम्यूनोथेरपी’. रुग्णाची कर्करोगाविराेधात लढण्याची प्रतिकारशक्ती वाढवून त्यावर मात करणारी ही उपचारपद्धती विकसित झाली आहे. परंतु, ती महागडी असल्याने प्रतिसाद कमी मिळत आहे.

कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी ४ फेब्रुवारी हा ‘जागतिक कॅन्सर दिन’ पाळला जाताे. यावर्षी या दिनाची थीम ही ‘क्लाेज द केअर गॅप’ म्हणजेच कर्करोगावरील उपचारात येणारे अडथळे कमी करणे अशी आहे. बदललेली जीवनशैली, व्यसने, पिकांवर कीटकनाशकांचा व रासायनिक खतांचा अतिवापर, प्रक्रियायुक्त खाद्य पदार्थांचा वाढता वापर आदी कारणांमुळे कर्करोग वाढत आहे.  इम्यूनाेथेरपी काेणत्या रुग्णांना उपयुक्त ठरेल. ते जेनेटिक तपासणीद्वारे ठरवले जाते. 

इम्यूनाेथेरपी हे इंजेक्शन स्वरूपात उपलब्ध आहे. त्याचे उपचार दाेन वर्षांपर्यंत चालतात. यामुळे रुग्णातील प्रतिकारशक्ती वाढून कर्करोगाच्या पेशींवर मात करते. परंतु, ती प्रत्येक रुग्णांवर चालेलच असे नाही. त्यासाठी काही जनुकीय तपासण्या कराव्या लागतात.

aकर्करोगावरील ही साइड इफेक्ट नसलेली उपचारपध्दती आहे. १०० पैकी ५ ते ६ रुग्ण या उपचाराला पसंती देत आहेत.  - डाॅ. तुषार पाटील, कर्करोगतज्ज्ञ, सह्याद्री हाॅस्पिटल.

टॅग्स :cancerकर्करोग