iit delhis research claims ticoplanin drug is ten times more effective on corona virus | CoronaVirus News : कोरोनावर सापडले रामबाण औषध, IIT दिल्लीचा दावा

CoronaVirus News : कोरोनावर सापडले रामबाण औषध, IIT दिल्लीचा दावा

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रकोप वाढतच चालला आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वच स्तरातून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आयआयटी दिल्लीतील एका संशोधनात एक रामबाण औषध कोरोनावर प्रभावी ठरत असल्याचं समोर आलं आहे. वैद्यकीयदृष्ट्या मंजूर असलेले औषध 'टेएकोप्लानिन' कोरोनाच्या उपचारांसाठी प्रभावी पर्याय ठरू शकते आणि सध्या वापरल्या जाणा-या इतर औषधांपेक्षा दहापट जास्त प्रभावी आहे. संस्थेच्या कुसुमा स्कूल ऑफ बायोलॉजिकल सायन्सच्या संशोधनात 23 मान्यताप्राप्त औषधांचा अभ्यास करण्यात आला असून, त्यात कोरोना व्हायरसवर उपचारांचा पर्याय असल्याचे दाखवण्यात आलं आहे. 

आयआयटी दिल्लीचे प्रोफेसर अशोक पटेल म्हणाले, “वापरात असलेल्या इतर महत्त्वांच्या औषधांशी टेएकोप्लानिनची तुलना करताना आमच्या प्रयोगशाळेच्या परिस्थितीत सार्स-सीओव्ही-2च्या विरुद्ध लोपिनवीर आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्विन यांसारख्या औषधांच्या तुलनेत टेएकोप्लानिन 10 ते 20 पट प्रभावी आहे. ”पटेल यांना संशोधनात एम्सचे डॉ. प्रदीप शर्मा यांनीही सहकार्य केले. आंतरराष्ट्रीय जर्नल ऑफ बायोलॉजिकल मॅक्रोमोलिक्यूलमध्येही हे प्रकाशित झाले आहे. टेएकोप्लानिन एक एफडीए मंजूर ग्लायको पेप्टाइड अँटिबायोटिक आहे, जे कमी विषाक्तता असलेल्या ग्रॅम-पॉझिटिव्ह बॅक्टेरियाच्या संक्रमणांच्या उपचारांसाठी वापरले जाते.

टेएकोप्लानिनचा क्लिनिकल अभ्यास नुकताच रोममधील सपिएन्झा विद्यापीठात झाला, असे पटेल यांनी सांगितले. कोरोनाच्या उपचारासाठी टेएकोप्लानिनची भूमिका निश्चित करण्यासाठी अल्पवयीन, मध्यम आणि गंभीर पातळीवरील रुग्णांच्या मोठ्या वर्गावर तपशीलवार क्लिनिकल तपासणी आवश्यक आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: iit delhis research claims ticoplanin drug is ten times more effective on corona virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.