आजकाल ब्लूटूथ आणि वायरलेस डिवाइसचा ट्रेंड चालला आहे. स्मार्टफोनपासून स्मार्टवॉचपर्यंत सगळ्या यंत्राना ब्लूटूथ सर्पोट करत असल्यामुळे लोकांना हे वापरायला खूप आवडतात. गेल्या काही वर्षांपासून वायर असणारे इअरफोन्स वापरले जात होते. पण सध्याच्या काळात वायरलेसचा ट्रेंड जबरदस्त सुरू आहे. तसंच याचा वापर करत असताना कोणत्याही प्रकारची वायर लागत नाही. तसंच मोबाईल हातात सुध्दा ठेवावा लागत नाही. बाजारात सुद्दा सर्वाधिक विकल्या जात असलेल्या ईअरफोन्समध्ये वायरलेसची संख्या जास्त आहे.
बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे हेडफोन्स असताना तुमच्यासाठी योग्य असणारा इअरफोन कोणता हे समजणं खूप कठिण असतं. काही इअरफोन्स विकत असलेल्या कंपन्या दावा करत आहेत की हेडफोन्सचा वापर करून तुम्ही तेच ऐकू शकता जे तुम्हाला ऐकायचं असतं. पण असे इअरफोन्स सुद्दा तुमच्यासाठी घातक ठरू शकतात.
खूप लोकांना हेडफोन्सच्या वापरामुळे नकळतपणे डोकेदुखीचा त्रास होत असतो. तसंच काही लोकांना कान दुखण्याची समस्या उद्भवते. असं म्हटलं जातं की इअरफोन्स काढल्यानंतर त्या व्यक्तींना बाहेरच्या गोष्टी कमी ऐकायला येतात. तर काही जणांना कमी ऐकू येण्याची समस्या इअरफोन्सच्या अतिवापरामुळे होते. कारण त्यामुळे कानांच्या नसांवर दबाव पडत असतो. आणि त्यामुळे कानाचे कार्य योग्यरित्या चालत नाही.
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण कानाच्या दुखण्याचे रुपांतर हळूहळू डोकेदुखीत होत जाते. सध्याच्या काळात इअरफोन्सच्या वापरामुळे कानावर पडणारा दबाव मोजण्यासाठी कोणतेही यंत्र उपलब्ध नाही. अनेक कंपन्यांनी आपल्या खास बनावटीच्या इअरफोन्सवर नॉईस कॅन्सलींगची सुविधा दिली आहे. यात वापकर्ता ० ते१० च्या मध्ये आपल्या सोयीनुसार सेट करू शकतो. जर तुम्ही नवीन इअरफोन्स विकत घेत असाल तर काही गोष्टींची काळची घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही इअरफोन्स घेत असताना आपल्या कानांबद्दल जर संवेदनशील असाल तर ऑनलाईल इअरफोन्सची खरेदी करू नका. नॉईस कंट्रोल कॅन्सलेशन हेडफोन्स घेत असाल तर एडजस्टेबल असावेत.