शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

कच्च्या कांद्यामुळे फैलावणाऱ्या 'साल्मोनेला' आजाराची वाढतेय दहशत, जाणून घ्या लक्षणं अन् उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 17:37 IST

पांढऱ्या आणि पिवळ्या कांद्यामध्ये साल्मोनेला आढळून आला आहे. तेथे ज्या लोकांच्या घरात लाल, पिवळा आणि पांढरा कांदा आहे, त्यांनी ते फेकून द्यावेत, असा सल्ला सीडीएसने दिला आहे. सीडीएसला असे आढळून आले आहे की, सॅल्मोनेलाच्या (what is salmonella) संपर्कात आलेल्या ७५ टक्के लोकांनी कच्चा कांदा खाल्ला होता.

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत साल्मोनेलाचा (salmonella) प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. अमेरिकेच्या ३७ राज्यांमध्ये साल्मोनेलामुळे ६५० लोक आजारी पडले आहेत. अमेरिकन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDS) ने यासाठी कांदा हा मुख्य स्त्रोत मानला आहे. वेबएमडीच्या बातमीनुसार, सीडीएसने म्हटले आहे की, मेक्सिकोमधून आयात केलेल्या कांद्यामध्ये साल्मोनेलाचा स्रोत सापडला आहे. लाल, पांढऱ्या आणि पिवळ्या कांद्यामध्ये साल्मोनेला आढळून आला आहे. तेथे ज्या लोकांच्या घरात लाल, पिवळा आणि पांढरा कांदा आहे, त्यांनी ते फेकून द्यावेत, असा सल्ला सीडीएसने दिला आहे. सीडीएसला असे आढळून आले आहे की, सॅल्मोनेलाच्या संपर्कात आलेल्या ७५ टक्के लोकांनी कच्चा कांदा खाल्ला होता.

साल्मोनेला दूषित पाणी किंवा अन्नामुळे होतोसाल्मोनेला संसर्ग किंवा साल्मोनेलोसिस हा एक सामान्य जीवाणूजन्य रोग आहे. ज्यामुळे अन्न विषबाधा होते. हा आजार पचनसंस्थेवर हल्ला करतो, ज्यामुळे पोटाशी संबंधित समस्या उद्भवतात. साल्मोनेला जीवाणू सामान्यतः प्राण्यांच्या आतड्यांमध्ये आढळतात आणि मानवाच्या शरीरातून पचनमार्गातून बाहेर जाते. साल्मोनेला दूषित पाणी किंवा अन्नाचे सेवन करून मानवांना या रोगाची लागण होऊ शकते.

साल्मोनेला रोगाचे कारणकच्चे मांस, चिकन इत्यादी खाल्ल्याने साल्मोनेला होऊ शकतो.  कच्च्या फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये साल्मोनेला बॅक्टेरिया देखील असू शकतात, म्हणून कच्ची फळे आणि भाज्या खाताना काळजी घेणं आवश्यक आहे. अनपेस्चराइज्ड दूध आणि दुग्धजन्य पदार्थ देखील साल्मोनेलाचे कारण असू शकतात. मऊ चीज, आइस्क्रीम आणि ताकात साल्मोनेला असू शकतो. कच्चे अंडे देखील साल्मोनेलाचे कारण असू शकते. आपण आपले हात नीट स्वच्छ केले नाही तरी साल्मोनेला संसर्ग होऊ शकतो. साल्मोनेला सामान्यतः प्राण्यांमध्ये आढळतो, म्हणून पाळीव प्राणी देखील साल्मोनेला वाहक असू शकतात.

या आजारात काय होतेसाल्मोनेला संसर्गामुळे, बहुतेक लोक अतिसार, ताप किंवा ओटीपोटात क्रॅम्पची तक्रार करतात. त्याची लक्षणे शरीरात सहा तास ते सहा दिवसांदरम्यान दिसतात. या बॅक्टेरियाचे काही प्रकार अतिशय धोकादायक असतात आणि ते मूत्र, रक्त, हाडे आणि मज्जासंस्थेवरही हल्ला करतात. या परिस्थितीत हे प्रकरण खूप धोकादायक असू शकते. सीडीएसने असा सल्ला दिला आहे की, जर डायरिया तीन दिवसांपेक्षा जास्त काळ टिकत असेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

उपचार काय आहेसहसा हा संसर्ग काही दिवसांनी बरा होतो. काही प्रकरणांमध्ये, डॉक्टरांना भेटणे आवश्यक असेल. डॉक्टर प्रतिजैविक घेण्याची शिफारस करतात. या संसर्गामध्ये अतिसार होतो, ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता असते. म्हणूनच तुम्ही भरपूर पाणी प्यावे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स