शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरतात पपईची पानं; असा करता येईल वापर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 12:03 IST

सध्या पावसाने दडी मारली असली तरीदेखील अनेक आजारांनी आपली डोकी वर काढली आहेत.  सगळीकडे मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांनी धुमाकूळ घातला असून सातत्याने रूग्णांच्या  संख्येत सातत्याने वाढ होत आहे.

सध्या पावसाने दडी मारली असली तरीदेखील अनेक आजारांनी आपली डोकी वर काढली आहेत.  सगळीकडे मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांनी धुमाकूळ घातला असून सातत्याने रूग्णांच्या  संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यावर उपाय म्हणून डॉक्टरांच्या औषधांसोबतच काही घरगुती उपाय करणं देखील फायदेशीर ठरतं.  फळं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात हे आपण सारेच जाणतो, पण त्यातल्या त्यात पपई खाण्याचे अनेक फायदे आहेत. पपईप्रमाणेच पपईची पानंही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. अनेक आजरांवर पपईच्या पानांचा रस फायदेशीर असतो. डेंग्यू, मलेरिया याशिवाय पपईच्या पानांचा रस हार्ट अटॅक, डायबेटीज, डेंग्यू आणि कॅन्सर यांसारख्या आजारांपासून शरीराचं रक्षण करतो. संशोधनानुसार, पपईच्या पानांमध्ये डेग्यूंचा प्रभाव कमी करण्याची क्षमता असते. त्याचबरोबर रोगप्रतिकारक क्षमता मजबूत करून शरीराचा इन्फेक्शनपासून बचाव करण्यासह मदत होते. जाणून घेऊयात पपईच्या पानांचे आरोग्यदायी फायदे...

1. प्लेटलेट काउंट वाढविण्यासाठी 

अनेक संशोधनातून ही गोष्ट सिद्ध झाली आहे की, पपईच्या पानांचा रस प्यायल्याने शरीरातील प्लेटलेट्स आणि आरबीसी काउंट वाढतो. त्याचप्रमाणे ब्लड सर्क्युलेशनही वाढतं. यामुळे डेंग्यू झालेल्या रूग्णांना पपईच्या पानांचा रस पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडूनही देण्यात येतो. 

2. कॅन्सरपासून बचाव

पपईच्या पानांच्या रसामध्ये अॅन्टी-ट्यूमर गुणधर्म मोठ्या प्रमाणावर असतात. जे कॅन्सरचे काही प्रकार, विविध प्रकारच्या अॅलर्जी यांसारख्या रोगांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतात. 

3. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी

संशोधनानुसार, पपईच्या पानांच्या रसामध्ये मोठ्या प्रमाणावर अॅन्टीऑक्सिडंट असतात. याचा ज्यूस प्यायल्याने ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी आणि किडनी, लिव्हर आणि पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. 

4. बद्धकोष्ठता  आणि मूळव्याधावर परिणामकारक

पपईला लॅक्सेटिव्ह म्हणून ओळखले जाते. जे बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. याच्या पानांचा रस प्यायल्याने पोटाच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यdengueडेंग्यू