शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शरीरावरील चामखीळ दूर करण्यासाठी बेस्ट घरगुती उपाय, एकदा करून बघाच..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 14:46 IST

Mole removal at home : चामखीळीने चेहऱ्याला नुकसान तर होत नाही, पण त्याने सौंदर्याला नक्कीच ग्रहण लागतं. पण ही चामखीळ दूर करण्यासाठी काही घरगुती उपायही आहे.

Mole removal at home : लोक चेहऱ्याचं सौंदर्या कायम ठेवण्यासाठी नको नको ते करतात. अनेक उपाय करून चेहऱ्यावरील डाग, काळपटपणा दूर केलाही जातो. पण काही गोष्टी असा असतात ज्यामुळे चेहऱ्याच्या सौंदर्याला ग्रहण लागतं. असाच एक प्रकार आहे चामखीळ. चामखीळीने चेहऱ्याला नुकसान तर होत नाही, पण त्याने सौंदर्याला नक्कीच ग्रहण लागतं. पण ही चामखीळ दूर करण्यासाठी काही घरगुती उपायही आहे. ज्याने तुम्ही चामखीळ नेहमीसाठी गायब करू शकता. चला जाणून घेऊ हे घरगुती उपाय...

लसणाचा वापर

जर तुमच्या चेहऱ्या किंवा मानेवर चामखीळ असेल आणि याने तुमचं  सौंदर्य कमी होत असेल तर ही चामखीळ दूर करण्यासाठी तुम्ही लसणाचा वापर करू शकता. त्यासाठी लसूण सोलून कळ्यांचे बारीक बारीक तुकडे करा. हे तुकडे चामखीळ असलेल्या भागावर लावा आणि वरून बॅंडेज बांधा. साधारण 4 ते 5 तास ते तसंच राहू द्या. असं तुम्ही लागोपाठ तीन ते चार दिवस केलं तर चामखीळ पूर्णपणे गायब होईल.

कांदा आणि लसणाचा वापर

चेहऱ्यावरील तीळ किंवा चामखीळ दूर करण्यासाठी लसणाचासोबतच कांद्याचाही वापर करू शकता. यासाठी तुम्ही कांदा आणि लसूण दोन्ही एकत्र करून बारीक करा. त्यातील रस काढा. आता कॉटनच्या मदतीने हा रस चामखीळ असलेल्या भागावर लावा. 20 ते 25 मिनिटांनंतर ते तसंच राहू द्या. काही वेळाने तो भाग पाण्याने धुवून घ्या. काही दिवस हा उपाय केल्यावर तुम्हाला चामखीळ दिसणार नाही.

लसणासोबत अ‍ॅप्पल साइडर विनेगर

कांद्याशिवाय तुम्ही लसणाच्या पेस्टमध्ये अ‍ॅप्पल साइडर विनेगर मिश्रित करा. लसूण आणि विनेगरची पेस्ट तीळ किंवा चामखीळीवर लावा. अर्धा ते तसंच राहू द्या. काही दिवस हा उपाय करा तीळ आणि चामखीळ दोन्ही गायब होतील.

(टिप : वरील लेखातील टिप्स या सामान्य माहितीवर आधारित आहे. यात आम्ही कोणताही दावा करत नाही. तुम्हाला काही समस्या असेल तर तज्ज्ञांना संपर्क करा मगच या टिप्स वापरा.) 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजी