शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
6
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
7
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
8
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
9
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
10
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
11
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
12
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
13
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
14
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
15
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
16
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
17
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
18
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
19
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
20
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी

पिवळे दात चमकदार करण्याचे बेस्ट घरगुती उपाय, एकदा करून बघाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 12:20 IST

Teeth Health : दात चमकवण्यासाठी मार्केटमध्ये शेकडो प्रोडक्ट मिळतील, पण त्यातील केमिकलमुळे हिरड्यांना धोका होऊ शकतो. जर तुम्हाला चमकदार दात हवे असतील तर काही घरगुती उपायही करु शकतात. 

Teeth Health : अनेक लोकांचे दात वेगवेगळ्या कारणांनी पिवळे असतात. आजकालच्या काही चुकीच्या खाण्यामुळे आणि काही चुकीच्या सवयींमुळे दात पिवळे होतात. पाण्यातील केमिकल्स, तंबाखू आणि कलर्ड पदार्थ खाल्ल्यानेही दातांवर पिवळेपणा येतो. दात चमकवण्यासाठी मार्केटमध्ये शेकडो प्रोडक्ट मिळतील, पण त्यातील केमिकलमुळे हिरड्यांना धोका होऊ शकतो. जर तुम्हाला चमकदार दात हवे असतील तर काही घरगुती उपायही करु शकतात. 

बेकींग सोडा

बेकींग सोडा थोडा जाड आणि खरबडीत असतो. त्याने दातांवर स्क्रब केलं जाऊ शकतंय. याचा वापर तुम्ही लिंबूसोबत करु शकता. लिंबूचा रस सायट्रिक अॅसिड असतं, जे ब्लिचिंगसारखं काम करतं. त्यामुळे या दोन्हींचा वापर एकत्र केल्यास दात चांगले चमकदार होतील. 

बेकींग सोडा कसा वापराल?

एक चमचा बेकींग सोडा घ्या आणि याची पेस्ट करण्यासाठी यात लिंबाचा रस टाका. ही पेस्ट ब्रशने दातांवर लावा आणि एक मिनिटांसाठी तसाच ठेवा. त्यानंतर चांगल्याप्रकारे तोंड धुवा.

दातांना चमकदार करण्यासाठी हेही उपाय

१) स्ट्रॉबेरी -

स्ट्रॉबेरीचे काही तुकडे बारीक करुन ती पेस्ट दातांवर लावून मसाज करा. दिवसातून दोनदा असे केल्यास दातांचा पिवळेपणा जातो.  

२) संत्र्याची साल

संत्र्याच्या सालीने दात साफ केल्यास काही दिवसातच पिवळेपणा जाऊन दात चमकायला लागतात. यासाठी रोज रात्री झोपताना संत्र्याची साल दातांवर घासा. संत्र्याच्या सालमध्ये व्हिटॅमिन सी आणि कॅल्शिअम असतं. जे दातांची चमक आणि मजबूती कायम ठेवतं. 

३) लिंबू

लिंबूचे नैसर्गिक ब्लिचींग गुणधर्म दातांवरही उपायकारक ठरतात. दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी लिंबाची साल दातांवर घासावी. लिंबू आणि मीठ एकत्र करुन दातांची मसाज करा. असे दोन आठवडे केल्यास दातांचा पिवळेपणा जाणार.  

४) खोबऱ्याचं तेल

खोबऱ्याचं तेल किंवा तिळाच्या तेलाने दात साफ करणे ही एक आयुर्वेदिक पद्धत आहे. एक चमचा खोबऱ्याचं तेल दातांवर लावा. आठवड्यातून दोनदा असे केल्यास फायदा होईल.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य