शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चिमुटभर मीठ आणि मोहरीच्या तेलाचे 2 थेंब दूर करतील दातांचा पिवळेपणा, रक्त येणंही थांबेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 17:38 IST

दातांना निरोगी ठेवण्यासाठी केवळ बाजारातील टूथपेस्टवर अवलंबून राहून चालत नाही. काही घरगुती उपायही तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

पिवळ्या आणि दुर्गंधी देणाऱ्या दातांमुळे अनेकदा चारचौघांमध्ये लाजिरवाण्या क्षणांचा सामना करावा लागतो. तुम्ही रोज ब्रश करत असूनही तुमचे दात पिवळे असतील, त्यातून दुर्गंधी येत असेल आणि हिरड्यांमधून रक्त येत असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय ट्राय करू शकता.  दात स्वच्छ करण्यासाठी काही नियम आहेत जे तुम्ही नेहमीच फॉलो केले पाहिजेत. त्यासोबतच असे पदार्थ खावेत ज्यामुळे ते चमकदार आणि मजबूत होतील. दातांना निरोगी ठेवण्यासाठी केवळ बाजारातील टूथपेस्टवर अवलंबून राहून चालत नाही. काही घरगुती उपायही तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

मोहरीचं तेल आणि मीठ

या दोन्ही गोष्टी पूर्णपणे  क्लीन्जरसारखं काम करतात आणि सोबतच तोंडाची दुर्गंधीही दूर करतात. दातांवरील पिवळेपणा घालवण्यासोबतच या मिश्रणाने दातांवरील कीड, रक्तस्त्राव आणि हिरड्यांवरील सूज यांसारख्या गंभीर समस्या दूर करता येतात.

- कशामुळे दात होतात खराब

जास्त गोड खाल्ल्याने

तोंडाची योग्य काळजी न घेणे

नियमितपणे दात स्वच्छ न करणे

नियमितपणे चेकअप न करणे

कोणत्याही स्वरूपात तंबाखूचं अधिक सेवन

सतत खाऱ्या पाण्याचं सेवन केल्याने

- दातांसाठी फायदेशीर मीठ

मोहरीचं तेल आणि मीठ एक पूर्वीपासून वापरला जाणारा घरगुती उपाय आहे. ज्याचा वापर हिरड्या साफ करणे आणि दातांवरील पिवळेपणा दूर करण्यासाठी केला जातो. एका रिसर्चनुसार, मीठ एका हलक्या घर्षणाच्या रूपात काम करतं, ज्यामुळे दात चमकदार होतात. त्यासोबतच यात फ्लोराइडचा एक नैसर्गिक स्त्रोतही आहे. जो दात आणि हिरड्यांसाठी फायदेशीर आहे.

मोहरीचं तेलही फायदेशीर

एका रिसर्चनुसार, मोहिरीच्या तेलाने तुमच्या हिरड्या मजबूत होतात आणि दातांवरील प्लाक दूर होतं. प्लाक सामान्यपणे बॅक्टेरियाच्या कारणामुळे बनतं. जे दातांवर दिसतं. मोहरीच्या तेलाने ते दूर होतं. तसेच हिरड्यांमधून रक्त येत असेल तर तेही याने थांबतं. या दोन्ही गोष्टींचा वापर हिरड्यांवरील सूज कमी करता येते आणि रक्तस्त्राव काही प्रमाणात नियंत्रित केला जाऊ शकतो.

कसा करावा वापर?

फक्त एक चिमुटभर मीठ किंवा सैंधव मीठ घ्या. यात काही थेंब मोहरीचं तेल टाका. हे मिश्रण बोटाच्या मदतीने दातांवर हलक्याने घासा. जवळपास दोन ते तीन मिनिटे अशी मालिश करा. नंतर गरम पाण्याने तोंड धुवा. याचा वापर नियमितपणे करा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य