शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

जेवण केल्यावर छातीत जळजळ होते? तर अशाप्रकारे झोपण्याची ही सवय सोडा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 10:10 IST

How To Cure Acid Reflux: वेळीच यावर उपचार केले नाही तर वेगवेगळ्या समस्येंचा सामना करावा लागतो. पण ही समस्या झोपण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळेही होऊ शकते, हे अनेकांना माहीत नसतं.

How To Cure Acid Reflux: अनेकदा आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे आणि लाइफस्टाईलमुळे छातीत किंवा गळ्यात जळजळ होण्याची समस्या होते. या समस्येला  हार्टबर्न किंवा अॅसिड रिफ्लक्स असं म्हटलं जातं. ही एक सामान्य समस्या आहे. पण वेळीच यावर उपचार केले नाही तर वेगवेगळ्या समस्येंचा सामना करावा लागतो. पण ही समस्या झोपण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळेही होऊ शकते, हे अनेकांना माहीत नसतं.

काय आहे अॅसिड रिफ्लक्स?

अॅसिड रिफ्लक्स किंवा हार्ट बर्न डायजेशनसंबंधी एक समस्या आहे. यात जे अॅसिड आपलं अन्न पचवण्यासाठी असतं ते फूड पाइप म्हणजे ओएसोफेगसच्या माध्यमातून आपल्या गळ्यापर्यंत येतं. ज्यामुळे समस्या निर्माण होते. 

अॅसिड रिफ्लक्सची मुख्य लक्षणे

पोटातील अॅसिड गळ्यापर्यंत येणे

गळ्यात आंबटपणा जाणवणे

छाती किंवा गळ्यात जळजळ होणे

अन्न गिळण्यात समस्या होणे

गळ्यात का होते जळजळ?

आपल्या पोटात अन्न पचवण्यासाठी जे अॅसिड रिलीज होतं ज्याला पचन रस म्हटलं जातं. जेव्हा अन्न फूड पाइपने पोटाकडे जाऊ लागतं तेव्हा इसोफेजिअल स्फिंक्चर नावाचा एक वॉल्व ओपन होतो आणि अन्न पोटात पोहोचतं. जेव्हा अॅसिडचं प्रमाण जास्त होतं ते फूड पाइपच्या माध्यमातून गळ्यापर्यंत येऊ लागतं. ज्यामुळे ही समस्या होते.

कसं झोपल्याने होते ही समस्या

गळ्यात जळजळ होण्याचा संबंध तुमच्या स्पीपिंग पोस्चरशी संबंधित आहे. जर तुम्ही पोटावर किंवा पाठीवर जास्त झोपत असाल तर याने अॅसिड रिफ्लक्सची शक्यता जास्त वाढते. यामुळे जास्तीत जास्त हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, तुम्ही एका कडेवर झोपा. जेणेकरून ही समस्या होणार नाही.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य