शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने सत्तेसाठी इतरांची सरकारं पाडली, कुटुंबांमध्ये भांडणं लावली"; अखिलेश यादवांची टीका
2
सर्वांनी माघार घेतली तर उमेदवार-नोटामध्ये निवडणूक का नाही? आयुक्त राजीव कुमारांनी केले स्पष्ट
3
Lipi Rastogi Suicide Note : मुंबईत आयएएस दाम्पत्याच्या मुलीची आत्महत्या, 'सुसाइड नोट'मध्ये काय? आलं समोर...
4
"आश्वासक बदल दिसला नाहीतर मी..."; CM शिंदेंचा उल्लेख करत शरद पवारांचा सरकारला इशारा
5
"कोणी केले सांगा, आम्ही त्यांना शिक्षा देऊ"; अमित शाह यांनी धमकावल्याच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
6
भारतातल्या पहिल्या निवडणुकीच्या मास्टरमाईंडवर येतोय सिनेमा, विद्या बालनच्या पतीची मोठी घोषणा
7
विजयापूर्वीच जल्लोषाची तयारी, पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून भाजपा कार्यालयापर्यत होणार रोड शो  
8
पॉवर शेअर चमकला, सरकारचा आहे ५१ टक्के हिस्सा; १३ एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी करा, भाव वाढणार..."
9
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पुढील लोकसभा निवडणूक एप्रिलमध्येच संपविणार
10
“आमच्या नादाला लागू नका, उद्धव ठाकरे हे...”; रवी राणांच्या दाव्यावर संजय राऊतांचा पलटवार
11
"हातकणंगलेमधून मीच निवडून येणार"; निकालाआधीच राजू शेट्टींनी थेट लीडच सांगितलं
12
T20 World Cup मधील सर्वात तरूण आणि वयस्कर खेळाडू कोण? तब्बल २५ वर्षांचे अंतर
13
प्रेरणादायी! इंजिनिअर झाला वेटर, विकली चित्रपटाची तिकिटं; ६ वेळा नापास, ७ व्या प्रयत्नात IRS
14
Akasa Air च्या दिल्ली-मुंबई विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; अहमदाबादेत ईमर्जन्सी लँडिंग
15
Exit Poll मध्ये भाजप्रणित एनडीएला बहुमत; गुंतवणूकदारांच्या उड्या, Adani च्या शेअर्समध्ये तुफान तेजी
16
निवडणूक आयोग गायब नव्हता; लोकसभा निकालापूर्वी पत्रकार परिषद घेत आयुक्तांनी सुनावले
17
BREAKING Lipi Rastogi: आयएएस अधिकारी विकास रस्तोगींच्या मुलीची आत्महत्या, मंत्रालयासमोरच्या इमारतीत घडला प्रकार
18
महाराष्ट्रात आम्ही ३५ पेक्षा जास्त जागा जिंकणार; निकालाआधी विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा
19
बहिणीला प्रियकरासोबत पाहताच संतापला भाऊ; वडिलांसह मिळून केली मुलाची निर्घृण हत्या
20
चर्चेतील 'या' हाॅट सीट्सवर बाजी मारणार तरी काेण ? कुठे लागू शकतात धक्कादायक निकाल?

Ayushman Bharat : 'या' सरकारी योजनेतून 3.8 कोटी लोकांना मिळाले मोफत उपचार; कोणाला घेता येईल लाभ? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 5:40 PM

Ayushman Bharat : या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3.8 कोटी लोकांना मोफत उपचार मिळाले आहेत. सरकारने 2018 मध्ये ही योजना सुरू केली. 

नवी दिल्ली : देशातील गरीब घटकांना मोफत उपचार देण्यासाठी सरकार आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (Ayushman Bharat Yojana) राबवत आहे. याअंतर्गत केंद्र सरकार लोकांना 5 लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत करण्याची सुविधा देते. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3.8 कोटी लोकांना मोफत उपचार मिळाले आहेत. सरकारने 2018 मध्ये ही योजना सुरू केली. 

अलीकडेच, या योजनेला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया (Dr Mansukh Mandaviya) यांनी आयुष्मान भारतच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले की, गेल्या चार वर्षांत देशातील सुमारे 4 कोटी लोकांना या योजनेअंतर्गत मोफत उपचाराचा लाभ मिळाला आहे.

कोणतीही व्यक्ती या योजनेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही अर्ज करू शकते. आयुष्मान ही भारत सरकारची आरोग्य योजना आहे, ज्या अंतर्गत सरकार लोकांना आयुष्मान भारत गोल्डन कार्ड (Ayushman Bharat Golden Card) प्रदान करते.

कोण करू शकतो अर्ज?या योजनेंतर्गत आयुष्मान भारत गोल्डन कार्डद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना रुग्णालयात जाऊन आपले उपचार मोफत करता येतील. आयुष्मान भारत योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे. जर कोणी स्वतःहून या योजनेसाठी अर्ज करत असेल तर त्याचे नाव SECC-2011 मध्ये असले पाहिजे. SECC म्हणजे सामाजिक आर्थिक आणि जाति जनगणना. तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमची पात्रता तपासावी लागेल. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम mera.pmjay.gov.in या वेबसाइटवर जावे लागेल.

असा करू शकता ऑनलाइन अर्ज- सर्वात आधी mera.pmjay.gov.in या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करा. - त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड टाका. - यानंतर तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर ओटीपी येईल. - ओटीपी नंबर टाका. यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल.- तेथे तुम्ही ज्या राज्यातून अर्ज करत आहात ते राज्य निवडा. - यांनंतर तुमची पात्रता तपासण्यासाठी मोबाईल नंबर, नाव, रेशन कार्ड नंबर किंवा RSBY URN नंबर टाका. - तुमचे नाव पेजच्या उजव्या बाजूला दिसत असल्यास, तुम्ही पात्र आहात. - तुम्ही 'कुटुंब सदस्य' टॅबवर क्लिक करून लाभार्थी तपशील देखील तपासू शकता. - याशिवाय, तुम्ही जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्राला भेट देऊन तुमची पात्रता तपासू शकता.

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारतHealthआरोग्य