शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
2
Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
3
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 
4
चाललंय तरी काय? रोहित- विराटनंतर आणखी एका स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
5
'राईचा पर्वत केला'; सरन्यायाधीश गवईंनी प्रोटोकॉल प्रकरणात याचिका करणाऱ्या वकिलाला झापले
6
पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल
7
Astrology: जून देणार 'या' पाच राशींच्या नशिबाला गती, येणार अच्छे दिन, बदलणार स्थिती!
8
IPL 2025 Final वरून मोठा राडा ! BCCI च्या निर्णयावर बंगाल सरकारचा घणाघाती आरोप
9
‘७५ वर्षं जगला, खूप झालं, आता पाकिस्तानचे फार दिवस उरलेले नाहीत’, योगी आदित्यनाथ यांचा इशारा 
10
IPL 2025: शुभमन गिल- ऋषभ पंतमध्ये वाद सुरू? मैदानातील व्हिडीओ समोर आल्यानंतर चर्चांना उधाण
11
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
12
Shani Dosha: शनि महादशेचा त्रास तान्ह्या बाळांनाही होतो का? काय आहे त्यावर उपाय? जाणून घ्या!
13
राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; महावितरणकडून ‘हाय अलर्ट’ जारी
14
रोहित- विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? गंभीरनं एका वाक्यात दिलं उत्तर!
15
जसप्रीत बुमराहने वाढवलं BCCIचं टेन्शन, टीम इंडियातून इंग्लंड दौऱ्यावर फक्त इतकेच सामने खेळणार
16
ज्यांनी ट्रेनिग दिले त्यांनाच डसला! AI ने मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालविल्या
17
मुंबई-दिल्ली महामार्गावर कार थांबवली, महिलेसोबत सुरू केले अश्लील चाळे, भाजपा नेत्याचा व्हिडीओ व्हायरल 
18
२५ लाख रोजगार, ७५ हजार कोटींची गुंतवणूक! मुकेश अंबानी 'या' राज्यातील तरुणांचं बदलणार भविष्य
19
भारत पाकिस्तानला आणखी एक दणका देण्याच्या तयारीत; FATF ग्रे लिस्टमध्ये येणार पाक...
20
'धरीला पंढरीचा चोर' गाण्यातील 'मुक्ता'ने जिंकलं प्रेक्षकांचं मन! सध्या काय करते अभिनेत्री?

Hair Fall Tips : केसगळती हे एक नवं 'महासंकट' आहे का?; वाचा, आयुर्वेद तज्ज्ञांच्या सोप्या अन् उपयुक्त टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 18:25 IST

Hair Fall Tips : मागील दशकापासून केसगळतीचा त्रास होणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड वाढली आहे. २० ते २५ या वयोगटातील अनेकांमध्ये जणू केसगळती (Hair Fall Issue) हे एक नवे महासंकटच आहे.

- डॉ. वरालक्ष्मी यनामंदरा, आयुर्वेद तज्ज्ञ

तंत्रज्ञानातील प्रचंड प्रगतीमुळे २१ व्या शतकातील आयुष्य फार सोपं झालं आहे. मात्र त्याचवेळी बैठी जीवनशैली आणि व्यस्त वेळापत्रकांमुळे आपल्या अंतर्गत होमिओस्टॅसिस म्हणजे बाह्य बदलांविरोधात समतोल राखण्याच्या शरीराच्या क्षमतेवरच परिणाम होत असल्याने आपण अनेक आजारांचा सामना करत आहोत.

मागील दशकापासून केसगळतीचा त्रास होणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड वाढली आहे. २० ते २५ या वयोगटातील अनेकांमध्ये जणू केसगळती (Hair Fall Issue) हे एक नवे महासंकटच आहे. चुकीच्या आहार सवयी, जीवनशैली आणि तणावपूर्व जगण्यामुळे केसांचे आजार फार वेगाने वाढत आहेत.

दिवसाला ५० ते १०० केस गळणे हे तसे सामान्य आहे. मात्र, यापेक्षा अधिक केस गळत असल्याचे तुमच्या निदर्शनास येत असेल तर याचा अर्थ या त्रासामागे काहीतरी आरोग्यविषयक समस्या आहे. लांब, सुंदर आणि दाट केस असणं हे आकर्षक असण्याचं सर्वात मोठं लक्षण मानलं जातं.

आयुर्वेद ही एक परिपूर्ण अशी प्राचीन वैद्यकीय पद्धती आहे. फक्त जीवनशैलीची औषधे यापलिकडेही हे बरेच काही आहे. अंतर्गत आणि बाह्य वातावरणाशी जुळवून घेत आरोग्यदायी जीवन जगणे यात शिकवले जाते. आयुर्वेदानुसार, आपल्या शरीरातील आरोग्यदायी अस्थी धातू (हाडांच्या ऊती)चा परिणाम म्हणजे केस. अस्थी धातूंचे आरोग्य उत्तम पचन आणि शरीरातील दोषांमधील समतोल यावर अवलंबून असते. केसगळतीला कारणीभूत ठरणारे काही मुद्दे खाली देण्यात आले आहेत.

केसगळतीची कारणे :

आवश्यक पोषणतत्त्वांचा अभाव असणारा अयोग्य आहार

अपुरी झोप आणि प्रचंड ताण

मसालेदार, आंबट आणि खारट पदार्थांचे अतिरिक्त सेवन

मिठाचा अधिक वापर, जेवणाच्या अनियमित वेळा, न्याहारी न करणे आणि शरीराला पोषण न मिळणे

धूर, ऊन आणि धुरके अशा पर्यावरणीय घटकांचा अधिक संपर्क आल्यानेही केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो

या सर्व मुद्द्यांमुळे वात दोषासोबत पित्त दोष आणि इतर दोष वाढतात आणि केसांची मुळे कमकुवत झाल्याने केस गळू लागतात केसगळती कशी थांबवावी?

केसगळतीच्या समस्येचा सामना करण्यासाठी काही सोप्या पद्धती आहेत.

 टाळूला कोकोनट बेस्ड तेल लावणे

आयुर्वेदानुसार डोकं हे त्रिमर्मांमधील एक आहे. डोक्याला दररोज तेल लावल्याने डोक्यातील सर्व संवेदनांचे (सेन्स ऑर्गन) कार्य सुधारते. केसांना तेल लावल्याने केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि कॉर्टेक्सला बळकटी मिळते. केसांना कोकोनट-बेस्ड तेलाने मालिश केल्यास केसांना संरक्षण मिळते. हे तेल कंडिशनरसारखे काम करते आणि डोके आणि मानेतील रक्ताभिसरणाची क्रिया सुधारते. वर आपण पाहिलेच की केस हे अस्थी धातूंचे उत्पादन आहे आणि केसांना तेलाने मालिश केल्याने रक्ताभिसरण वाढवून केस मजबूत होतात आणि रोमा कुपांच्या (केसांची मुळे) वाढीला चलना दिली जाते, असे मानले जाते. यातील स्निग्धांश आणि शीत गुणधर्मांमुळे डोक्याला कोकोनट-बेस्ड तेलाने मालिश केल्यास पित्त आणि वात दोषांचा समतोल साधला जातो. कोकोनट-बेस्ड हेअर ऑईलमध्ये मुबलक प्रमाणात एमसीटी आणि लॉरिक अॅसिड असते आणि त्यामुळे केस आणि टाळूचे आरोग्य सुधारते. अशा प्रकारे खराब झालेले केस यामुळे सुधारतात आणि नव्या केसांच्या वाढीत साह्य मिळते. त्यामुळे हे तेल केसगळतीच्या समस्येवर परिणामकारक ठरते.

नाकातील ड्रॉप्स

दैनंदिन सवय म्हणून वैद्यकीय तेल किंवा तूप नाकात घातल्याने केसगळती कमी होते आणि नव्या केसांची वाढ होते. नाकातील ड्रॉप्समुळे टाळूला पोषण मिळते आणि केस मजबूत होतात. नास्यमुळे केसांच्या बीजकोषांना चालना मिळून नवे केस येतात.

केस स्वच्छ करणे

केसांवरून आंघोळ करताना नेहमी पाण्याचे तापमान पहायला हवे. आयुर्वेद सांगते की केसांसाठी गरम पाणी कधीही वापरू नये कारण त्यामुळे केसांची आणि डोळ्यांची क्षमता हळूहळू कमी होत जाते. तुम्हाला झेपेल इतके गार पाणी केस धुण्यासाठी वापरा. केमिकलचा समावेश असलेले शॅम्पू वापरू नका. त्यामुळे केसांना त्रास होतो आणि ते अधिक खराब होत जातात.

डोक्याला जपा

अतिरिक्त वारा, सूर्यप्रकाश, पाऊस किंवा धूळ असेल तर डोक्यावर टोपी, पगडी घाला किंवा छत्री वापरा. त्यामुळे पर्यावरणीय घटकांपासून संरक्षण मिळते.

आरोग्यदायी आहार आणि व्यायाम

तुमच्या आहारात धान्य, पालेभाज्या, फळे आणि प्रोटीनचा समावेश करा. बदामासारखे नट्स रोज खाल्याने झिंक आणि बायोटीनसारख्या अत्यावश्यक पोषक घटकांमध्ये वाढ होते. आपल्या केसांच्या वाढीसाठी हे घटक महत्त्वाचे मानले जातात. आयुर्वेदानुसार ओजसला चालना देण्यासाठी हे अगदी उत्तम पदार्थ आहेत. तुमचे एकूण आरोग्य उत्तम ठेवून तुम्हाला आजारांपासून वाचवणारे ओजस हे एक महत्त्वाचे शारीरिक बळ आहे.

ताजे शिजवलेले अन्न खाल्यास सर्व पोषकघटक अधिक चांगल्या रितीने शरीरात शोषले जातात. त्यामुळे जठराग्नी वाढतो आणि त्यामुळे अस्थी धातूसह सर्व प्रकारच्या ऊती प्रक्रियांचे कामकाज योग्य रितीने चालते.

व्यायामामुळे तुमच्या शरीरातील संप्रेरकांचा म्हणजेच हार्मोन्सचा समतोल राखला जातो आणि त्यांच्या अभिसरणात साह्य होते. बलासन, अधो मुख शवासन आणि वज्रासन अशी साधी आसनेही परिणामकारक ठरतात.

तणावाचे नियंत्रण करा

ताणतणाव हा आधुनिक जीवनाचा भाग आहे. त्यामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. माझ्यामते, ताण कमी करण्यासाठी चटकन करण्याचा उपाय म्हणजे कोकोनट-बेस्ड तेल त्वचेसाठी आणि केसांसाठी वापरणे आणि त्यानंतर खांदे आणि डोक्याला मालिश करणे, बागेत चालायला जाणे, काही काळ सोशल मीडिया बंद करणे. तुम्हाला प्रचंड तणाव जाणवत असेल तर त्यासंदर्भात साह्य मिळवण्यासाठी प्रोफेशनल तज्ज्ञांशी बोला.

रासायनिक उत्पादने

केमिकल-बेस्ड हेअर प्रोडक्ट्सचा नियमित वापर केल्यास तुमच्या केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि केसांच्या मुळांचे नुकसान होते. केसांना शक्य तितके आरोग्यदायी ठेवण्यासाठी अपायकार केमिकल ट्रिटमेंट, हॉट आयर्निंग टाळा.

शिरो अभ्यंग, शिरो पिचू

केसांसाठी योग्य औषधी आणि कोकानट-बेस्ड केसांच्या तेलाने शिरो अभ्यंग आणि शिरो पिचू या आयुर्वेदिक ट्रिटमेंट घेतल्यास डोक्यातील अतिरिक्त उष्णता काढून टाकली जाते आणि केसांना फायदा होतो.

तुमचा आहार, जीवनशैली बदलून आणि काही साध्या आयुर्वेदिक पद्धती अवलंबून तसेच नियमित केसांना तेल लावण्यासारखे केसगळतीचे उपाय करून नैसर्गिकरित्या केसगळती थांबवणे शक्य आहे!

टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य