​झोपेच्या गोळ्या घेणे किती सुरक्षित !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 15:36 IST2016-12-23T15:36:04+5:302016-12-23T15:36:04+5:30

आजच्या धकाकीच्या आयुष्यात निद्रानाश ही गंभीर समस्या भेडसावतेय. बहुतांश लोक या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी झोपेच्या गोळ्या घेण्यास सुरूवात करतात. या गोळ्यांमुळे व्यवस्थित झोपही येते व सकाळी उठल्यावर रिलॅक्सही फिल होते.

How safe sleeping pills take! | ​झोपेच्या गोळ्या घेणे किती सुरक्षित !

​झोपेच्या गोळ्या घेणे किती सुरक्षित !

च्या धकाकीच्या आयुष्यात निद्रानाश ही गंभीर समस्या भेडसावतेय. बहुतांश लोक या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी झोपेच्या गोळ्या घेण्यास सुरूवात करतात. या गोळ्यांमुळे व्यवस्थित झोपही येते व सकाळी उठल्यावर रिलॅक्सही फिल होते. मात्र, या गोळ्या आरोग्यासाठी कितपत सुरक्षित आहेत, याचाही विचार करणे गरजेचे आहे. कधी कधी झोपेसाठी या गोळ्या घेणे लाभदायक आहे, मात्र त्याही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत. या गोळ्यांमधील बेंजोडायजेपाइनमुळे नर्व्हस सिस्टम रिलॅक्स होते त्यामुळे झोप लागते. याव्यतिरिक्त ज्या गोळ्यांमध्ये नॉनबेंजोडायजेपाइन आढळतं, त्याचे साइड इफेक्ट प्रोफाइल सेफ असतं, असे अलीकडील शोधात स्पष्ट झाले आहे. तसेच काही परिस्थितीत औषधांचा प्रभाव, लिव्हर आणि किडनीवर पडतो. म्हणून आपण मनाने या गोळ्या घ्यायला नको.
डॉक्टर जे औषध लिहून देतात त्याने आपण रिलॅक्स होता आणि साइड इफेक्ट्सपासून वाचता. हे औषध सुरू करताना डॉक्टरांना हेही विचारणे गरजेचे आहे की आपल्याला या गोळ्या किती दिवस आणि किती मात्रेत घ्यायच्या आहेत. झोपेसाठी टॅबलेटव्यतिरिक्त ओरल स्प्रे किंवा विरघळणाºया गोळ्याही येतात.
डॉक्टर असे औषध एका क्रमाप्रमाणे देतात ज्याने आपल्याला याची सवय लागायला नको आणि आपल्या शरीरावर याचे दुष्परिणाम व्हायला नको. परंतु हे टॅबलेट घेण्याव्यतिरिक्त स्वत:ला फीट ठेवण्यासाठी वर्कआऊट केले पाहिजे. कॅफीनचे सेवन कमी करण्यासाठी कॉफी आणि चहा कमी प्यायला पाहिजे.

Web Title: How safe sleeping pills take!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.