शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

किती दिवसांनी बदलावा तुमचा टूथब्रश? जाणून घ्या वापरण्याची पद्धत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 14:39 IST

अनेकांना हे माहीत नसतं की, ब्रश किती दिवसांनी बदलायला हवा. जर हे माहीत नसेल तर तुम्हाला आरोग्यासंबंधी अनेक समस्या होऊ शकतात.

जगातील सगळेच लोक आपल्या दिवसाची सुरूवात ब्रश करून करतात. त्यानंतर बाकीची कामे होतात. ब्रश करणं हा लोकांचा रोजचा कार्यक्रम आहे. कारण यामुळे तोंडाची स्वच्छता होते आणि आरोग्य चांगलं राहण्यास मदत मिळते. यामुळे लोक ब्रशची निवडही फार काळजीने करतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, ब्रश किती दिवसांनी बदलायला हवा. जर हे माहीत नसेल तर तुम्हाला आरोग्यासंबंधी अनेक समस्या होऊ शकतात.

एक टूथब्रश आपण किती दिवस वापरावा आणि ब्रश कधी बदलावा हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सोबतच हेही जाणून घेऊया की, ब्रश बदलण्याची वेळ कधी आणि कशी आली आहे.

किती दिवसांनी बदलावा ब्रश?

द सेंटर्स फॉर डिजीज प्रिव्हेंशन अॅन्ड कंट्रोलनुसार, व्यक्तीने 3 ते 4 महिन्यांनंतर आपला टूथब्रश बदलायला हवा. याचा अर्थ असाही नाही की, ब्रश खराब झाल्यावरही तुम्ही चार महिन्यांपर्यंत वाट बघावी. जर तुमच्या ब्रशचे ब्रिशल म्हणजे दात खराब झाले असतील, तुटत असतील किंवा पूर्णपणे वाकले असतील तर तुम्ही वेळीच ब्रश बदलण्याची गरज आहे. 

कसं कळेल ब्रश बदलण्याची वेळ झाली?

तसं तर ब्रशचे दाते पाहून तुम्हाला हे समजू शकतं की, ब्रश बदलण्याची वेळ झाली आहे. जसे की, ब्रशचे ब्रिशल तुटत असतील तर तो वेळीच बदलावा. अनेक लोकांचं मत आहे की, ब्रिशलच्या खालच्या भागात पांढला थर जमा झाले असेल तर वेळीच ब्रश बदलावा. जास्त काळ एकाच ब्रशचा वापर करणं दातांसाठी चांगलं ठरत नाही.

आजारात वापरलेला ब्रश बदला

जर तुम्ही आजारी असाल आणि आजारादरम्यान एखाद्या ब्रशचा वापर केला असेल तर तो ब्रश बदलायला हवा. हा ब्रश तुम्ही बरे झाल्यावर वापरला तर त्यातील बॅक्टेरिया पुन्हा तुमच्या शरीरात जाऊ शकतात. 

या आजारांचा असतो धोका

एका वेबसाइटनुसार, जर तुम्हाला व्हायरस किंवा फंगसशी संबंधित काही आजार आज झाला असेल तर तुम्ही बरे झाल्यानंतर ब्रश लगेच बदलावा. कोरोना व्हायरस दरम्यान अनेक डॉक्टरांनी सल्ला दिला होता की, पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांनी निगेटिव्ह झाल्यावर ब्रश बदलावा. तुमच्या ब्रश इतरांच्या ब्रशसोबत ठेवत असाल तर त्यांनाही तुमचा आजार होऊ शकतो. अशात आजारा दरम्यानचा ब्रश लगेच बदलावा.

काय काळजी घ्यावी?

टूथब्रश भिजवू नका

जास्तीत जास्त लोक हे आधी टूथब्रश भिजवतात आणि मग त्यावर टूथपेस्ट लावतात. ब्रश भिजवल्यानंतर त्याचे दाते नरम होतात. पण असे केल्याने ब्रशची दात चांगल्याप्रकारे स्वच्छ करण्याची क्षमता कमी होते. असं न करण्याचा डॉक्टरही सल्ला देतात कारण अशाने टूथब्रश खराब होतो. तसेत भिजलेल्या टूथब्रशवर टूथपेस्ट लावल्याने पेस्टचा प्रभावही कमी होतो. त्यामुळे दात स्वच्छ करण्याआधी टूथब्रश भिजवू नका आणि जर तसे करणे गरजेचेच आहे तर १ सेंकदापेक्षा जास्त तो पाण्याखाली धरु नका.

टॉयलेटमध्ये ठेवू नका

अनेक घरांमध्ये टॉयलेट आणि टूथब्रश ठेवण्याची जागा फारच जवळ असते. टॉयलेटमध्ये फ्लश केल्यावर अनेक किटाणू उडतात आणि ते सहजपणे आजूबाजूच्या वस्तूंवर सहज जाउन बसतात. त्यात ब्रशही असतो. त्यामुळे ब्रश कधीही टॉयलेटच्या आजूबाजूला ठेवू नये. ज्या बॉक्समध्ये टूथब्रश ठेवता तो बॉक्स आठवड्यातून एकदा नक्की स्वच्छ करा. असे केल्याने त्यातील बॅक्टेरिया ब्रशमध्ये जाणार नाहीत. 

बंद करुन ठेवू नका

आजकाल बाजारात ब्रशसोबत त्याचे दाते झाकून ठेवण्यासाठी वेगवेगळे बॉक्सेस मिळतात. पण ब्रश अशाप्रकारे बंद करुन ठेवणे योग्य नाहीये. याने ब्रशमधील किटाणू वाढतात. सोबतच टूथब्रशचा वापर करुन झाल्यावर तो सरळ उभा ठेवा. याने ब्रशमधील पाणी खाली जाईल आणि ब्रश लगेच कोरडा होईल. याने ब्रशमध्ये किटाणू वाढण्यासाठी लागणारा ओलावाही राहणार नाही.

वेगवेगळे ठेवा सर्वांचे ब्रश

ही चूक जवळपास प्रत्येक घरात केली जाते. पूर्ण परिवाराचे ब्रश एकाच ठिकाणी एकत्र ठेवले जातात. डॉक्टरांनुसार, असे केल्याने एका टूथब्रशमधील बॅक्टेरिया दुसऱ्या टूथब्रशमध्ये सहजपणे शिरतात. त्यामुळे सर्व ब्रश एकत्र ठेवू नका. 

टूथब्रशची स्वच्छता

अमेरिकन डेंटल असोसिएशननुसार, दर तीन महिन्यांनी ब्रश बदलायला हवा. तसेच ब्रशच्या स्वच्छतेचीही काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. ब्रशचे दाते पसरले असेल तर ब्रश बदला. जर तुम्ही एखाद्या गंभीर आजारातून नुकतेच बाहेर आले असाल तर ब्रश नक्की बदला.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य