शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कॅलरी शब्द अनेकदा ऐकला असेल, आता याचा वजन कमी करण्याशी संबंध जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 10:36 IST

Weight Loss : वजन कमी करताना एक बाब खूप महत्वाची आहे ती म्हणजे कॅलरी. जर तुम्ही कॅलरी कमी करत नसाल तर तुमचं वजन कमी होणार नाही.

Weight Loss : आजकाल बऱ्याच लोकांना वजन वाढण्याची समस्या होते. बरेच लोक वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात. पण काहींना यात यश मिळतं तर काहींना मिळत नाही. बरेच लोक वजन कमी करताना योग्य ती माहिती घेत नाहीत आणि काही चूका करून बसतात. ज्यामुळे त्यांना अनेक प्रयत्न करूनही वजन कमी करण्यात यश मिळत नाही. वजन कमी करताना एक बाब खूप महत्वाची आहे ती म्हणजे कॅलरी. जर तुम्ही कॅलरी कमी करत नसाल तर तुमचं वजन कमी होणार नाही. आज हेच समजून घेऊया जेणेकरून वजन कमी करायला मदत होईल. 

काय असतात कॅलरी?

कॅलरी म्हणजे आपण जे काही खातो, त्यातून निर्माण होणारी ऊर्जा म्हणजे कॅलरी. म्हणजे आपण जे खातो किंवा पितो त्यातून मिळणाऱ्या ऊर्जेला मोजण्याच्या प्रमाणाला कॅलरी म्हटलं जातं. अजून एक गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या पदार्थांतून वेगवेगळ्या कॅलरी मिळतात. 

रोज किती कॅलरी आवश्यक? 

USDA नुसार, २५ ते ३० वयोगटातील पुरूषांनी रोज २, ९०० कॅलरी घ्यायला हव्यात. तर महिलांनी रोज २, २०० कॅलरी घ्याव्यात. हे प्रमाण सामान्य स्थितीसाठी आहे. जर तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर तुमच्या वर्कआऊटच्या हिशेबाने तुमची रोजची कॅलरीची गरज वेगवेगळी असू शकते. 

कॅलरींचा सोर्स जाणून घेणे महत्त्वाचे

जर तुम्हाला फॅट लॉस करायचं असेल तर तुम्हाला कॅलरी सोर्सबाबत माहिती असणे गरजेचे आहे. म्हणजे तुम्ही जे काही खाता त्यातून मिळणाऱ्या कॅलरी तुमच्या आरोग्यासाठी चांगल्या आहे की वाईट. याने तुम्हाला फॅट लॉस करण्यास मदत होईल किंवा त्याने फॅट वाढतील? बाहेर मिळणारे जास्तीत जास्त पदार्थ किंवा रेस्टॉरंटच्या चटपटीत पदार्थांमध्ये वाईट कॅलरी असतात. 

फॅट लॉससाठी किती कॅलरी गरजेच्या?

जर तुम्हाला चरबी कमी करायची असेल तर साधारण रोजच्या एकूण कॅलरीपैकी ५०० कॅलरी कमी करायला हव्या. यादरम्यान तुम्हाला कार्बोहायड्रेटने मिळणारी कॅलरी पूर्णपणे बंद करावी लागेल. याचा अर्थ हा की, खाण्या-पिण्याच्या ज्या पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त आहे, ते पदार्थ खाणे तुम्ही पूर्णपणे टाळले पाहिजे. 

तुमच्या पूर्ण आहारातून प्रोटीनमधून मिळणाऱ्या कॅलरींना ५०-६० टक्के, फॅट २० टक्के आणि कार्बोहायड्रेटमधून मिळणारी कॅलरीचा आकडा ३० टक्के करायचा आहे. याचा फायदा हा होईल की, शरीरातील फॅट बर्न व्हायला सुरूवात होईल. दुसरा फायदा हा की, फॅटचं प्रमाण वाढल्याने तुमचं शरीर फॅट बर्निंग मोडवर येईल.

म्हणजे फॅट लॉस करताना जर तुम्ही योग्य प्रमाणात प्रोटीनचं सेवन कराल तर वजन कमी झाल्यावर तुमची त्वचा सैल होणार नाही. त्वचेच्या टोनिंगला एक चांगला शेप मिळेल. अनेक केसेसमध्ये लोक वजन कमी करतात पण प्रोटीनचं सेवन करत नाहीत, ज्यामुळे शरीरातून फॅट कमी होतं, पण त्वचा सैल होते. 

कमी खा आणि बर्निंग वाढवा

जर तुम्ही जिममध्ये जाऊन एक्सरसाइज करत नाहीत, तर तुम्ही रोज कमीत कमी रोज ३० मिनिट फिजिकल अॅक्टिविटी करावी लागेल. ज्याने तुमच्या कॅलरी बर्निंगमध्ये बॅलन्स राहील. तुम्हाला कॅलरीचं सेवन तर कमी करायचं आहेच, पण सोबतच बर्नही करायच्या आहेत. तेव्हाच तुमचं वजन संतुलित राहील आणि जाडेपणा कधीच होणार नाही. सोबतच तुम्हाला वर्कआऊट करण्याआधी तज्ज्ञांचा सल्लाही घेणे गरजेचे आहे. 

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स