हळदीचा चहा प्यायल्याने वजन झटपट होईल कमी, असं करा सेवन 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 10:05 AM2020-01-02T10:05:04+5:302020-01-02T10:09:02+5:30

वजन कमी  करण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो.

How to loss weight by using Turmeric tea | हळदीचा चहा प्यायल्याने वजन झटपट होईल कमी, असं करा सेवन 

हळदीचा चहा प्यायल्याने वजन झटपट होईल कमी, असं करा सेवन 

googlenewsNext

वजन कमी करण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो. बदलते वातावरण आणि जीवनशैली यांमुळे शरीराची योग्य काळजी घेतली जात नाही. त्यामुळे वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. त्यात लठ्ठपणाची समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवत असते. वाढलेलं कमी करणं हे कठीण होऊन बसतं. शरीरावरची अतीरीक्त चरबी कमी करण्यासाठी  डाएट करणं, कमी खाणं, व्यायाम करणं, काही गोष्टी आहारातून वगळणं असे प्रयत्न  सुरू होतात. 

अनेकवेळा वजन कमी करण्यासाठी चहाचे सेवन करू नये. असं सांगितलं जातं.  कारण  त्यातील साखरेमुळे शरीरातील कॅलरीज वाढण्याची शक्यता असते. तसंच दुधाचा जास्त वापर असल्यामुळे दुधात असलेल्या फॅट्समुळे वजन कमी होण्यास अडथळा निर्माण होतो. पण तुम्हाला  माहीत आहे का वजन कमी करण्यासाठी हळद घालून केलेला  चहा फायदेशीर ठरतो.  चला तर मग जाणून घेऊया हळदीचा चहा पिण्याने कशाप्रकारे वजन कमी होण्यास मदत होईल.

हळदीचे अनेक आरोग्यवर्धक फायदे  तुम्हाला आत्तापर्यंत माहीत आहेत. तज्ञांच्यामते हळदीत मोठ्या प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुण असतात. त्यामुळे हळदीच्या सेवनाने पचनक्रीया व्यवस्थित राहते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं.

हळदीचा चहा असा तयार करा.

वजन कमी करण्यासाठी हळदीचा चहा तयार करायचा असेल तर फार कमी साहीत्याची गरज असते. त्यासाठी सगळ्यात आधी हळदीचे चुर्ण तुम्हाला तयार करावे  लागेल. त्यानंतर आलं आणि पाण्याची आवश्कता असते.  हा चहा तयार करण्यासाठी एक ग्लास पाणी उकळत ठेवा. पाणी उकळायला लागल्यानंतर त्यात हळद आणि आल्याची पेस्ट घाला. २ मिनीटांनी गॅस बंद करा. कोमट झाल्यानंतर या चहाचे सेवन करा.


हळदीच्या चहाचे फायदे

हेल्दी राहण्यासाठी या चहाचे सेवन केल्यास फायदेशीर ठरेल. अनेक आजारांपासून सुटका मिळण्यासाठी हा चहा उपयुक्त ठरतो.  मधुमेह, कॅन्सर आणि हृदयाच्या रोगांपासून बचाव होतो.

सहसा असं दिसून येतं की लठ्ठपणामुळे मेटाबॉलीक रेट कमी झालेला असतो. त्यामुळे शरीराची पचनक्रीया  सुरूळीत कार्य करत नाही.  त्यामुळे शरीरातील चरबी वाढण्यास सुरूवात होते.  हळदीच्या चहाचं सेवन केल्यास मेटाबॉलीक रेट व्यवस्थित राहतो. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. 

हळदीच्या चहाचे सेवन केल्याने शरीरातील फॅट्स तसंच वाढलेला भाग  कमी होतो. हळदीमध्ये  एंटी-इंफ्लेमेट्री गुण असतात.  त्यामुळे  शरीरातील फॅट्स वेगाने कमी होतात.

Web Title: How to loss weight by using Turmeric tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य