शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
2
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
3
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
4
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
5
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
6
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
7
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
8
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
9
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
10
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
11
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
12
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
13
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
14
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
15
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
16
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
17
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
18
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
19
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
20
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना

तुमच्या घरातील चहा भेसळयुक्त नाही ना? ओळखा चहामधील भेसळ, FSSAI ने सांगितली युक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 16:04 IST

तुम्ही पिताय त्या चहामध्ये भेसळसुद्धा असू शकते. रंगीत पदार्थ आणि खराब झालेली पाने मिसळून चहामध्ये भेसळ करतात. यामुळे तुमच्या तोंडाची चव तर खराब होतेच पण असा चहा रोज प्यायल्याने आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. चला तर मग जाणून घेऊयात तुम्ही घरच्या घरी चहा पावडरमधील भेसळ कशी ओळखाल.

आपल्यापैकी अनेकांच्या दिवसाची सुरूवात एक कप चहाने होते. आपल्यापैकी बहुतेकांना त्याची चव आवडते. चहा प्यायल्यानंतर आपल्याला ताजेतवाने वाटते. ते आपली ऊर्जा वाढवण्यास मदत करते. ऑफिसमध्ये कामाचा थकवा दूर करण्यासाठी अनेकदा चहा प्यायला जातो. पण तुम्हाला माहित आहे का? तुम्ही पिताय त्या चहामध्ये भेसळसुद्धा असू शकते. रंगीत पदार्थ आणि खराब झालेली पाने मिसळून चहामध्ये भेसळ करतात. यामुळे तुमच्या तोंडाची चव तर खराब होतेच पण असा चहा रोज प्यायल्याने आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. चला तर मग जाणून घेऊयात तुम्ही घरच्या घरी चहा पावडरमधील भेसळ कशी ओळखाल.

चहातील भेसळीचा वाईट परिणामचहाच्या पानांमध्ये खराब पाने आणि रंगाची भेसळ करताता. त्याचबरोबर प्रक्रिया केलेल्या आणि रंगीत चहाची भेसळही चहाच्या पानांमध्ये केली जाते. यामुळे यकृताचे विकार आणि आरोग्याशी संबंधित इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.

खरी आणि बनावट कशी ओळखावीभारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने ट्विट केले आहे की तुम्ही चहामध्ये खराब झालेल्या पानांची भेसळ कशी ओळखू शकता.

सर्व प्रथम एक फिल्टर पेपर घ्या. आता चहाची पाने फिल्टर पेपरवर पसरवून ठेवा. थोडे पाणी शिंपडा जेणेकरून फिल्टर पेपर ओले होईल.जर चहामध्ये भेसळ असेल तर तुम्हाला फिल्टर पेपरवर डाग दिसतील.जर चहा शुद्ध असेल तर फिल्टर पेपरवर कोणताही डाग दिसणार नाही.

चहा पिण्याचे फायदेअनेक अभ्यासानुसार, ठराविक प्रमाणात चहा प्यायल्याने तुमच्या आरोग्याला फायदा होतो. चहामध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. चहा पिणे कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आणि रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारण्यासाठी देखील उपयुक्त आहे, परंतु जर तुमच्या चहामध्ये भेसळ असेल तर तुम्हाला हे फायदे मिळणार नाहीत, त्यामुळे चहामधील भेसळ तपासणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स