शहरं
Join us  
Trending Stories
1
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
2
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
3
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
4
मुंबईकर अमोल मुजुमदारची शांतीत क्रांती! भारतीय महिला संघाला असं बनवलं वर्ल्ड चॅम्पियन  
5
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
6
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
7
याच महिन्यात लाँच होणार ई-आधार ॲप; पाहा घरबसल्या काय-काय अपडेट करता येणार?
8
PPF चा जबरदस्त प्लान! पत्नीसोबत गुंतवणूक करा; मिळवा ₹१.३३ कोटींचा टॅक्स फ्री फंड, पाहा कसं?
9
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
10
Video: शाहरुख रात्री सर्वांना भेटायला आला, पण चाहत्यांनी केलं असं काही की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला
11
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
12
Stock Market Today: आठवड्याची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, PSU Bank च्या शेअर्समध्ये तेजी
13
वर्ल्ड चॅम्पियन महिला संघावर पैशांचा पाऊस; बीसीसीआयने ICC च्या रकमेचा विक्रम मोडला, 'इतके' कोटी देणार
14
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
15
उरण: विना व्हिसाचा ‘कॉर्न स्नेक’ भारतात; विदेशातून येताना टायरच्या कंटेनरमध्ये बसलेला लपून
16
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
17
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
18
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
19
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
20
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?

'या' 8 सवयीं स्मरणशक्ती वाढविण्यासाठी करतात मदत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 14:44 IST

लहानपणी आपल्या अगदी सगळ्या गोष्टी लक्षात राहायच्या. पण सध्या तंत्रज्ञानाच्या युगात अनेकदा छोट्या छोट्या गोष्टीही लक्षात ठेवणं अवघड झालं आहे. बऱ्याचदा अगदी बारिक-सारिक गोष्टी लक्षात ठेवणं अशक्य होतं.

(Image Credit : Verywell Mind)

लहानपणी आपल्या अगदी सगळ्या गोष्टी लक्षात राहायच्या. पण सध्या तंत्रज्ञानाच्या युगात अनेकदा छोट्या छोट्या गोष्टीही लक्षात ठेवणं अवघड झालं आहे. बऱ्याचदा अगदी बारिक-सारिक गोष्टी लक्षात ठेवणं अशक्य होतं. अनेकदा तर एखादी गोष्ट प्रयत्न करूनही लक्षात ठेवणं अशक्य होतं. ही स्मरणशक्ती कमकुवत होण्याची लक्षणं आहेत. अनेकदा असं म्हटलं जातं की, वाढत्या वयाचा परिणाम आपल्या मेंदूवरही होतो. परंतु, काही उपाय केल्यानंतर तुम्ही ही समस्याही दूर करू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनशैलीमध्ये काही खास बदल करावे लागतील. कारण आम्ही जे सांगणार आहोत, ते अगदी सोपे उपाय आहेत. जे स्मरणशक्ती वाढविण्यासोबतच मेंदूचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतात. जाणून घेऊया 8 खास उपायांबाबत... 

एक्सरसाइज 

एक्सरसाइज अर्थात व्यायाम केल्यामुळे शरीराचं सुदृढ राहण्यास मदत होते. जेव्हा एखादी व्यक्ती एक्सरसाइज करत असते त्यावेळी मुबलक प्रमाणात ऑक्सिजन घेते आणि शरीरामध्ये ऊर्जेसोबतच नवीन पेशींच्या निर्मितीसाठी मदत करते. एक्सरसाइजमुळे शरीरातील पेशी एकमेकांच्या संपर्कात असतात आणि मेंदूचं कार्य सुरळीत राहतं. 

संतुलित आहार 

आपल्या आहाराचाही आपल्या मेंदूवर परिणाम होत असतो. एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार, डाएटमधून मिळणारी एनर्जी आणि शुगरचा 20 टक्के भाग मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. शरीरामध्ये साखरेचं प्रमाण कमी जास्त झालं तर त्याचा परिणाम तर याचा थेट मेंदूवर होतो. मेंदूचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी ड्रायफ्रुट्स, मासे आणि फळं फायदेशीर ठरतात. 

तणाव ठेवा दूर 

सतत तणावात राहणं आरोग्यासाठी उत्तम नसतं. दरम्यान काही एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार, तणावामध्ये मेंदू व्यवस्थित काम करतो. पण जर तणावाचा काळ वाढला तर डिप्रेशनची समस्या उद्भवू शकते. कधी-कधी आपल्या मेंदूला आराम देण्यासाठी तुम्हाला एकांतामध्ये काही नव्या ठिकाणांना भेट देणंही फायदेशीर ठरतं. यामुळे मेंदूवर येणारा ताण कमी करण्यास मदत होते. 

काही नव्या गोष्टी करण्यासाठी 

मेंदूचा व्यायामही होणं आवश्यक असतं. जर तुम्हाला मेंदूचं आरोग्य राखायचं असेल तर काही नवीन गोष्टी करणं गरजेचं असतं. जसं काही नव्या गोष्टी शिकणं, वाचणं, लिहणं. खेळही मेंदूचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतात. त्यामुळे प्रयत्न करा की, दररोज एखादा खेळ तरी खेळता येईल. 

मनोरंजन आणि संगीत 

तणावामध्ये असाल तर संगीत किंवा एखादा मनोरंजनात्मक कार्यक्रम तुम्हाला फार मदत करेल. तुम्ही कधी अनुभव घेतला असेल की, जेव्हा तुम्ही एखादा चित्रपट पाहता किंवा गाणं ऐकता, तेव्हा आपल्या शरीराच प्रत्येक अवयव अॅक्टिव्ह राहतो. ही क्रिया मेंदूचं आरोग्य राखण्यासाठी उत्तम मानली जाते. 

शांत झोप आणि रिसर्च 

जर तुम्ही शांत झोप घेतली तर तुमचा मेंदूही व्यवस्थित काम करण्यासाठी मदत करतो. जर तुमची झोप योग्य नसेल तर त्यामुळे तुमच्या स्मरणशक्तीवर याचा वाईट परिणाम होतो. जर तुम्हाला झोप येत नसेल तर एखादं छानसं पुस्तक वाचा किंवा रिसर्च करा. यामुळे मेंदू अ‍ॅक्टिव्ह राहण्यासाठी मदत होते. 

लक्षात ठेवा 

आपण अनेकदा पाहतो की, रात्री उशीरा झोपल्यामुळे किंवा सकाळी उशीरा उठणं या दोन्ही गोष्टी शरीर आणि मेंदूसाठी योग्य नाहीत. प्रत्येक व्यक्तीला कमीत कमी 6 तासांची झोप घेणं आणि सकाळ लवकर उठण्याची सवय करून घेणं आवश्यक आहे. तसेच प्रयत्न करा की, रात्री झोपताना तुमच्या खोलीमध्ये अंधार असेल आणि जेव्हा सकाळी उठाल तेव्हा सूर्याचा प्रकाश. या दोन्ही गोष्टी मेंदूसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं)

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स