शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

कावीळचे योग्य निदान कसे कराल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 12:54 IST

Health Update: पावसाळा आला, पाणी गढूळ झाले की, कावीळचे रुग्ण वाढू लागतात.  पोटातील कावीळ, सफेद कावीळ इ. कावीळचे प्रकार अथवा नाव लोकांकडून ऐकायला मिळतात.  

- डॉ. अविनाश सुपे(पोटविकार तज्ज्ञ) 

पावसाळा आला, पाणी गढूळ झाले की, कावीळचे रुग्ण वाढू लागतात.  पोटातील कावीळ, सफेद कावीळ इ. कावीळचे प्रकार अथवा नाव लोकांकडून ऐकायला मिळतात.  खरे सांगायचे, तर कावीळ ही अनेक प्रकारची असते व कावीळ होण्याची कारणे देखील अनेक असतात. यासाठीच कावीळचे योग्य निदान होणे आवश्यक आहे. 

कावीळ होण्याची विविध कारणे : जंतुसंसर्गामुळे :  ज्याला इनइफेक्टिव हेपेटायटिस म्हटले जाते. हेपेटायटिस म्हणजे यकृताला आलेली सूज. जंतुसंसर्गामुळे अति सूक्ष्मजीवाणूच्या संसर्गाने कावीळ होऊ शकते. हेपेटायटिस ए आणि हेपेटायटिस ई विषाणू : हे विषाणू दूषित पाणी वा दूषित अन्नातून आपल्या पोटात जातात. यकृतावर हल्ला करतात व आपण जी कावीळ म्हणतो ती याच मुळे होते. जिची लक्षण पाहून व रक्त तपासणी करून निदान पक्केकरता येते.  यामध्ये रुग्णास थकवा व ताप येतो. डोळे पिवळे होतात व लघवी पिवळसर लाल होते. यकृताला सूज येते. रक्त तपासणीमध्ये बिलीरुबीन, एसजीओटी, एसजीपीटी, जीजीटी हे नॉर्मलपेक्षा दुपटीने वाढलेले असते. हेपाटायटीस ए हा सर्वसाधारणपणे लहान मुलांना होतो. पंधरा वर्षांनंतरच्या व्यक्तींना  हेपाटायटीस ई होतो. 

हेपेटायटिस बी आणि सी : हे विषाणू रक्तातून शरीरात शिरतात. सुरुवातीस साधा ताप व थकवा येतो. कावीळही होते. काही रुग्णांना हा आजार अनेक वर्षे राहतो. त्या मुळे काही वर्षांनंतर त्यांचे यकृत खराब होते. त्यांना सिरॉयसिस होतो व नंतर यकृताचा कर्करोग होण्याची शक्यता असते, म्हणूनच कावीळचे योग्य निदान करणे आवश्यक असते. 

हेपेटायटिस बी आणि सी यांची कारणे पुढीलप्रमाणे १. दूषित रक्त चढवल्याने बी आणि सी विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करतात.२. इंजेक्शनच्या सुया, सीरिंज वापरणे. शिवाय ऑपरेशनची इन्स्ट्रुमेंट्स जर हेपेटायटिस बी आणि सीच्या पेशंटमुळे इन्फेक्टेड असतील व नीट निर्जंतूक नसतील, तर रुग्णाला हेपेटायटिस बी आणि सी होऊ शकतो.३. ड्रग ॲडिक्ट : स्वतःला इंजेक्शन मारून घेताना तिथूनही हा विषाणू शरीरात शिरू शकतो. टॅटू करून घेतल्याने हा विषाणू शरीरात शिरू शकतो.४. असुरक्षित लैंगिक क्रिया : हेपेटायटिस बी किंवा सी झालेल्या व्यक्तीशी कंडोम न वापरता केलेल्या संभोगामुळे हा हेपाटायटीस होतो.५. आई यामुळे इन्फेक्टेड असेल, तर प्रसूतीच्या वेळी मुलाला हा आजार होऊ शकतो.कावीळचे  निदान : १. रुग्णाची नीट तपासणी केली जाते - यकृताला किती सूज आहे ? हे पाहिले जाते.२. विविध रक्ततपासणी करून कुठल्या प्रकारची कावीळ आहे ते शोधले जाते ? तिची तीव्रता कळते. ३. अल्ट्रासोनोग्राफी करून लिव्हरची सूज, तिची साइज, पित्ताशय, पित्तनलिका इ. पाहिले जाते.  या पलीकडे सिटी स्कॅन, एमआरआय, एंडोस्कोपी करून पुढचे तपास केले जातात. यकृत  किती प्रमाणात खराब झाले आहे, हे वरील तपासणीतून कळते. कावीळचे योग्य निदान आणि वेळेवर उपचार केल्यास बहुतेक रुग्ण पूर्णपणे बरे होतात. मात्र, हे सर्व डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करणे महत्त्वाचे आहे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स