पाय आणि छातीत दुखतंय? असू शकतो जीवघेणा आजार, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 09:59 AM2020-01-20T09:59:01+5:302020-01-20T10:14:08+5:30

दिवसेंदिवस वातावरणात होणारा बदल आणि वाढत जाणारे वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रदूषण,खाण्यापिण्याच्या  चुकिच्या सवयींमुळे जीवघेण्या आजारांचा धोका वाढत आहे.

How chest pain and leg pain are connected to heart disease | पाय आणि छातीत दुखतंय? असू शकतो जीवघेणा आजार, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

पाय आणि छातीत दुखतंय? असू शकतो जीवघेणा आजार, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

googlenewsNext

 दिवसेंदिवस वातावरणात होणारा बदल आणि वाढत जाणारे वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रदूषण,खाण्यापिण्याच्या  चुकिच्या सवयींमुळे जीवघेण्या आजारांचा धोका वाढत आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घ्यायची असेल आणि शरीराला आजारांपासून  लांब ठेवायचं असेल तर काही गोष्टी माहीत असणं गरचेचं असतं. म्हणूनच आज  आम्ही तुम्हाला  पायांच्या आणि छातीच्या दुखण्यामुळे वाढत असलेल्या कॅन्सरबद्दल सांगणार आहोत.

Related image(image credit- express.co.uk)

पाय आणि छातीत एकाच वेळी दुखणे ही  स्थिती सहसा उद्भवत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का पायांच दुखणं आणि हृदयाचे आरोग्य यांचात घनिष्ट संबंध आहे.  जर एखाद्या व्यक्तीला पाय आणि छातीत दुखण्याचा त्रास होत असेल त्वकरित वैद्यकिय सल्ला घेणे गरजेचं आहे. ( हे पण वाचा-हिवाळ्यात गुळाचा चहा पिण्याचे फायदे वाचाल, तर साखरेचा चहा विसराल)

Image result for heart diseases

पायांच्या नसा जेव्हा दुखत असतात तेव्हा त्या स्थितीला पेरिफेरल आर्टरी डिजीज  असे म्हणतात.  हा आजार जेव्हा होतो तेव्हा त्या ठिकाणी अतिरीक्त चरबी जमा झालेली असते. २०१४ च्या एका अभ्यासानुसार पेरिफेरल आर्टरी डिजीज असलेल्या लोकांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होत असलेल्या लोकांची संख्या जास्त  होती. जर तुम्हाला हा आजार झाला असेल किंवा पायांच्या नसा जास्त दुखत असतील तर  याचा परिणाम तुमच्या झोपेवर सुद्धा होऊ शकतो.  या आजाराचे मुळ लक्षणं मांड्या, मागचा भाग दुखणे, काखेत  दुखणे, मासपेशी दुखणे ही आहेत.

Image result for leg and chest pain

लक्षणं

नखं खराब होणे.

इरेक्टाइल डिसफंक्शन.

पायांच्या खालच्या भागाला तापमान वाढून दुखणे. 

पायांच्या बोटावर जखम होणे. ( हे पण वाचा-घरच्याघरी 'हे' योगासन कराल तर पोटाची चरबी होईल नक्की होईल कमी)

Related image

कोणत्या लोकांना होऊ शकतो  पेरिफेरल आर्टरी डिजीज

५० वर्षांपेक्षा कमी वय आणि डाटबिटीस असलेल्या व्यक्तींना सुद्धा हा आजार होऊ शकतो. एथोरोसलेरोसिस आणि लठ्ठपणाचे शिकार असलेल्या लोकांना  हा आजार होऊ शकतो.  तसंच धूम्रपान करत असलेल्या लोकांना हा आजार होण्याचा धोका असतो कार्डियाक सर्जरीनंतर हा आजार होण्याची शक्यता असते. 

Image result for leg and chest painएथेरोस्क्लेरोसिस 

पेरिफेरल धमनी रोग हा एथेरोस्क्लेरोसिस मुळे वाढत जातो.  एथेरोस्क्लेरोसिसमध्ये शरीराच्या नसांच्या भिंतीवर चरबी जमा झालेली असते.  त्यामुळे शरीरात होणारा रक्तप्रवाह  कमी होत असतो. याचा परिणाम पायांवर सगळ्यात आधी दिसून येतो. यांमध्ये रक्तवाहीन्यांना सुज येणे, शरीरावर जखमा होणे हा त्रास उद्भवतो. लिग्मेंट्स किंवा मांसपेशींची असामान्य रचना असल्यास हा त्रास जास्त होण्याचा धोका असतो. 

Image result for leg and chest pain

 या आजाराची सुरूवात जखमेपासून होत असते. जर तुमच्या पायांमध्ये झालेली जखम लवकर बरी होत नसेल तर  इस्किमिया होऊन ही जखम संपूर्ण शरीराला सुद्धा प्रभावित करत असते. यामुळे तुमच्या मेंदूवर परिणाम होऊ शकतो.  यामुळे रक्तवाहीन्यांमध्ये इन्फेक्शन होऊन शरीरातील रक्ताभिरण थांबू सुद्धा शकतं.  तुम्हाला या आजारापासून बचाव करायचा असल्यास काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.

Related image

जर तुम्ही  धूम्रपान करत असाल ती  सवय हळूहळू बंद करण्याचा प्रयत्न करा. 

डायबिटीज असेल तर साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवा

दररोज  व्यायाम करा. 

३५- ४० मिनिट  चालण्याचा प्रयत्न करा. 

फॅट्सचं प्रमाण कमी असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. 

Web Title: How chest pain and leg pain are connected to heart disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.