शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : कोरोनातून बरं झाल्यानंतरही मृत्यूचं सावट; रुग्णालयात भरती झालेल्या रुग्णांसाठी धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 11:10 IST

Corona Virus : कोरोना व्हायरसचा सामना करून रुग्णालयातून घरी परतलेल्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

कोरोना व्हायरसचा सामना करून रुग्णालयातून घरी परतलेल्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका नवीन रिसर्चनुसार, कोरोनामुळे रुग्णालयात दाखल व्हावं लागलेल्या लोकांना बरं झाल्यानंतर अडीच वर्षांपर्यंत मृत्यूचा आणि गंभीर आरोग्य समस्यांचा धोका असतो. 'इन्फेक्टियस डिसीजेस' या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिसर्समध्ये हे उघड झालं आहे, ज्यामध्ये फ्रान्समधील ६४,००० लोकांवर संशोधन करण्यात आलं.

कोरोनातून बरं झालेल्या रुग्णांनी आपल्या आरोग्याची नीट काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे. पॅरिसमधील बिचॅट हॉस्पिटलमधील संसर्गजन्य रोग तज्ञ आणि प्रमुख संशोधक डॉ. सारा टुबियाना म्हणाल्या की, हा रिसर्च कोविड-१९ चे दूरगामी परिणाम अधोरेखित करतो. आमच्या संशोधनातून असं दिसून आलं आहे की, रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना अनेक महिने आणि अनेक वर्षे गंभीर आरोग्य धोक्यांना तोंड द्यावं लागू शकतं.

हा रिसर्च जानेवारी ते ऑगस्ट २०२० दरम्यान रुग्णालयात दाखल झालेल्या ६३,९९० लोकांचा समावेश होता, ज्यांचे सरासरी वय ६५ वर्षे होते आणि ५३.१% पुरुष होते. त्यांची तुलना ३,१९,८९१ सामान्य लोकांशी करण्यात आली जे वय, लिंग यामध्ये समान होते, परंतु कोविडसाठी रुग्णालयात दाखल झाले नव्हते. निकालांवरून असं दिसून आलं आहे की, ठीक झालेल्या कोविड रुग्णांमध्ये मृत्युदर हा सामान्य लोकसंख्येपेक्षा खूपच जास्त होता.

कोणत्या समस्या आल्या?

या रुग्णांना पुन्हा रुग्णालयात दाखल होण्याचा, न्यूरोलॉजिकल, मानसिक, हृदय आणि श्वसनाच्या समस्यांचा धोका वाढल्याचं आढळून आलं. हा धोका पुरुष आणि महिलांसाठी सारखाच होता, मानसिक समस्या वगळता, जिथे महिलांना जास्त धोका होता. ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये अवयवांशी संबंधित आजारांसाठी पुन्हा रुग्णालयात भरती होण्याचं प्रमाणही जास्त होतं. रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर 30 महिन्यांपर्यंत न्यूरोलॉजिकल, श्वसन, किडनी निकामी होणं आणि मधुमेह यासारख्या आजारांचा धोका कायम राहतो, असंही रिसर्चमधून समोर आलं आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात?

संशोधनाचे सह-लेखक डॉ. चार्ल्स बर्डेट म्हणाले की, या निकालांवरून स्पष्टपणे दिसून येते की कोविड-१९ चे दीर्घकालीन परिणाम समजून घेण्यासाठी आणि ते रोखण्यासाठी अधिक संशोधनाची आवश्यकता आहे. हा रिसर्च आरोग्यसेवेसाठी एक मोठं आव्हान सादर करतो आणि रुग्णांची काळजी घेण्याच्या नवीन पद्धती स्वीकारण्याची गरज अधोरेखित करतो आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स