शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दातांच्या झिणझिण्यांमुळे त्रस्त आहात? 'या' घरगुती उपायांनी मिळेल त्वरित आराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 12:07 IST

दातांच्या हायपर सेन्सिटीव्हिटीचा त्रास अनेकांना असतो. असा त्रास होऊ लागल्यावर तुम्ही त्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. कारण त्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर तुम्हाला दातांच्या अन्य समस्या येऊ लागतात. दातांच्या झिणझिण्यांवर हे उपाय करा...

अनेकदा दात चांगले असूनही ते गरम किंवा थंड खाल्ल्यामुळे दुखतात. याचे कारण तुमच्या दातांचे नाजूक असणे. जर तुमच्या शरीरात कॅल्शिअमची कमी असेल तर तुमचे दातांना सतत झिणझिण्या बसत राहतात. म्हणजे तुम्ही काहीही खाल्ले तरी तुम्हाला त्रास होऊ लागतो. हायपर सेन्सिटीव्हिटीचा त्रास अनेकांना असतो. असा त्रास होऊ लागल्यावर तुम्ही त्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. कारण त्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर तुम्हाला दातांच्या अन्य समस्या येऊ लागतात. दातांच्या झिणझिण्यांवर हे उपाय करा...

लवंगाचे तेलदातांना झिणझिण्या येत असतील तर दाताखाली लवंग धरा. यादरम्यान कोमट पाणीच प्या. आंबट आणि थंड पदार्थ खाणं टाळा. लवंगामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीएन्फ्लामेट्री गुणधर्म असतात. घरात लवंगाचे तेल असेल तर अजूनच उत्तम! दुखणा-या दातावर लवंगाच्या तेलात बुडवलेला कापूस ठेवा आणि लगेचच आराम मिळवा.

लसणाची पेस्टलसणाच्या दोन पाकळ्या सोलून घ्या. दुखत असलेल्या दातावर ठेवून ते लसूण चावा. त्याचा रस दाताचं दुखणं कमी करेल. यामध्ये एलिसीन नावाचे जे घटक असते ते तुमच्या दातांसाठी चांगले असते. तसेच लसूण दातांमधील जंतू कमी करण्यास मदत करते. तुम्ही लसणाची पेस्ट करूनही दातांवर चोळू शकता. त्यानंतर कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करा.

आईल पुलिंगऑईल पुलिंगही दातांच्या झिणझिण्या थांबवण्याचा चांगला उपाय आहे. यासाठी तुम्ही लवंग किंवा नारळाच्या तेलाचा उपयोग करू शकता. नारळाच्या तेलात अँटीइन्फेमेंटरी गुण असतात ज्यामुळे दाताच्या झिणझिण्यांपासून आराम मिळतो. नारळाचे किंवा लवंगाचे तेल तोंडात टाका आणि २-३ मिनिटं त्याला तोंडात फिरवत रहा. त्यानंतर कोमट पाण्यात मीठ टाकून तुम्ही गुळण्या करा.

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स