शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फुफ्फुसांमध्ये जमा झालेली घाण स्वच्छ करण्यासाठी 'या' ४ पदार्थांचा करा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 10:18 IST

एका मर्यादेनंतर फुफ्फुसं खराब झाल्यास जीवघेणे आजार उद्भवण्याची शक्यता असते.

सध्या बदलती जीवनशैली आणि वाढतं प्रदुषण यांमुळे आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. सगळ्याच वयोगटात एक समस्या कॉमन दिसून येते ती म्हणजे श्वसनांच्या विकारांची. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला दम लागणं, श्वास घ्यायला त्रास होणं ही समस्या उद्भवते. अनेकांना मद्यपान, धुम्रपान करण्याची सवय असल्यामुळे त्यांची फुफ्फुस खराब व्हायला सुरूवात झालेली असते.

एका मर्यादेनंतर फुफ्फुस खराब झाल्यास जीवघेणे आजार उद्भवण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला घरगुती उपायांनी फुफ्फुसांची काळजी कशी घेता येईल याबाबत सांगणार आहोत. कारण आजारांपासून लांब राहायचं असेल तर शरीर डिटॉक्स करणं सुद्धा आवश्यक असतं. 

फुफ्फुसांना डिटॉक्स करण्यासाठी १ लीटर पाणी, ४०० ग्राम कापलेला कांदा, ५ चमचे मध, २ चमचे हळद आणि १ चमचा कापलेलं आलं या पदार्थांची आवश्यकता असणार आहे.  हा सोपा काढा तयार करण्यासाठी सगळ्यात आधी पाणी गरम करून घ्या. पाणी गरम झाल्यानंतर कांदा, आलं आणि हळद घालून मिक्स करा. कमी आचेवर पाणी उकळू द्या.  पाणी उकळून अर्ध्यापेक्षा कमी झाल्यानंतर गॅस बंद करा आणि हे पाणी थंड होऊ द्या. त्यानंतर यात मध घाला आणि एखाद्या भांड्यात ठेवून फ्रिजमध्ये ठेवा. हा काढा रोज सकाळी आणि संध्याकाळी २-२ चमचे प्या. जेवणाच्या अर्धा तास आधी आणि अर्धा तास नंतर तुम्ही हे सिरप पिऊ शकता. ( हे पण वाचा-युटीआय आणि यीस्ट इन्फेक्शनमध्ये 'हा' आहे फरक, लागण होण्याआधी जाणून घ्या लक्षणं)

या होममेड टॉनिकमध्ये आलं आणि कांदा आहे. त्या दोन्हींमध्ये  एंटी-बॅक्टीरियल, एंटी-वायरल आणि एंटी-इंफ्लेमेट्री गुण असतात. त्यामुळे शरीरातील व्हायरस आणि बॅक्टेरियांपासून संरक्षण करता येतं. या काढयातील पदार्थांमुळे रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते.फुफ्फुसांचे आरोग्य चांगलं राहून श्वसनाचे विकार उद्भवत नाहीत. पण या काढ्याचे सेवन करत असताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. सिगारेट ओढणं शरीरासाठी नुकसानकारक ठरतं. जर तुम्ही या काढ्याचे सेवन करत असाल तर धुम्रपानाची सवय सोडून द्या.  जर कोणत्याही आजारावर तुमची वैद्यकीय ट्रिटमेंट सुरू असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या काढ्याचे सेवन करू नका. ( हे पण वाचा-हृदय विकारांचे संकेत ठरू शकतात सामान्य वाटणारी 'ही' लक्षणे)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य