शरीरावरील चामखीळींनी त्रस्त आहात मग 'हे' उपाय करुन पाहाच, त्रासापासून कायमचे मुक्त व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 02:25 PM2021-11-17T14:25:06+5:302021-11-17T14:25:16+5:30

तुम्हालाही चामखिळींच्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर, काही घरगुती उपायांच्या मदतीनं तुम्ही त्या दूर करू शकता. तथापि, या उपायांचा परिणाम हळूहळू होतो आणि त्यांना काढून टाकण्यासाठी काही आठवडे लागू शकतात.

home remedies to get rid of warts | शरीरावरील चामखीळींनी त्रस्त आहात मग 'हे' उपाय करुन पाहाच, त्रासापासून कायमचे मुक्त व्हाल

शरीरावरील चामखीळींनी त्रस्त आहात मग 'हे' उपाय करुन पाहाच, त्रासापासून कायमचे मुक्त व्हाल

googlenewsNext

अनेक लोकांच्या चेहऱ्यावर, मानेवर, हातावर, पायांवर, पाठीवर चामखिळी असतात. त्या नको वाटतात. या चामखिळींमुळं तुमचं सौंदर्य कमी होतं आणि लोकांना त्यांची लाजही वाटत असते. जर तुम्हालाही चामखिळींच्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर, काही घरगुती उपायांच्या मदतीनं तुम्ही त्या दूर करू शकता. तथापि, या उपायांचा परिणाम हळूहळू होतो आणि त्यांना काढून टाकण्यासाठी काही आठवडे लागू शकतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हीही या चामखिळींच्या समस्येनं त्रस्त असाल तर, हे सोपे घरगुती उपाय जरूर करून पाहा.

सफरचंदाचं व्हिनेगर
सफरचंदाचं व्हिनेगर वापरलं तर, चामखिळी मुळापासून दूर होऊ शकतात. रोज किमान 3 वेळा कापसाच्या साहाय्यानं ते चामखिळींवर लावून वरती कापूस चिकटवा. हे रोज केल्यास काही दिवसात चामखीळांचा रंग गडद होईल आणि तेथील त्वचा कोरडी होईल. जर तुम्हाला जागी जळजळत असेल तर, तुम्ही त्यावर कोरफडीचं जेल लावू शकता.

लसणाच्या पाकळ्या
चामखीळ काढण्यासाठी लसणाच्या पाकळ्या सोलून कापून चामखीळांवर चोळा. तुम्ही त्याची पेस्ट बनवून सुद्धा चामखीळांवरही लावू शकता. असं केल्यानं चामखीळ काही दिवसातच पडते.

लिंबाचा रस
चामखीळांवर लिंबाचा रसही तुम्ही लावू शकता. कापसाच्या मदतीनं चामखीळावर लिंबू लावा. काही दिवसातच चामखिळी गळून पडतात.

बटाट्याचा रस
बटाटे कापून चामखीळांवर चोळल्यानंही त्यांच्यापासून सुटका मिळते. हवं असल्यास बटाट्याचा रस रात्रभर चामखीळांवर लावून ठेवा.

बेकिंग सोडा
चामखीळ काढण्यासाठी एरंडेल तेलात बेकिंग सोडा मिसळून पेस्ट तयार करा त्यावर लावा. त्याचा फायदा काही दिवसात दिसून येईल.

अननसाचा रस
चामखीळावर अननसाचा रस लावल्यास काही दिवसातच चामखीळांचा रंग हलका होऊन ते पडतात.

Web Title: home remedies to get rid of warts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.