(Image Credit : PhillyVoice)
वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या आयडियाच्या कल्पना लावत असतात. पण अनेकांना केवळ वरवरच्या गोष्टीच माहीत असतात. मात्र वजन कमी करायचं असेल तर अनेक गोष्टी समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. निसर्गाने आपल्याला अशा अनेक गोष्टी दिल्या आहेत ज्यातून पोषक तत्त्वे मिळतात.
अनेकप्रकारच्या खाद्य पदार्थांच्या आणि फळांच्या सालींमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. फायबर हे वजन कमी करण्यास फार फायदेशीर ठरतं. त्यामुळे रोजच्या आहारात फायबरचा समावेश करावा. फायबरमुळे वजन कमी करण्यास मदत तर मिळतेच, सोबतच सतत भूक लागत नाही आणि तुम्ही ओव्हरइटिंगपासून दूर राहता.
फायबर का गरजेचं?
फायबरचं मुख्य काम असतं पचनक्रिया मजबूत ठेवणे. फायबरच्या मदतीने शरीरातील टॉक्सिक पदार्थ वेगाने बाहेर काढले जातात. फायबरयुक्त पदार्थांचं सेवन केल्याने शुगरचं प्रमाणंही नियंत्रित राहतं. तसेच खासकरून भूक लागत नाही. फायबरचा आहारात भरपूर समावेश केल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत मिळते. सर्वात महत्वाचं म्हणजे फायबरने पचनक्रिया सुधारली तर तुमचं आरोग्य चांगलं राहतं आणि शरीराचा जाडेपणाचा सामना करावा लागत नाही.
मका, वेगवेगळ्या डाळी, हिरव्या भाज्या, ब्राउन ब्रेड, सुखा मेवा, गव्हाचं पीठ, मटार, ओटमील इत्यादींमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. वेगवेगळ्या धान्यातही फायबर असतं. त्यामुळे या गोष्टींचा आहारात समावेश करणं फायदेशीर ठरेल.
फायबर फूड ज्यांनी वजन कमी होण्यास होते मदत
१) केवळ ज्यूस सेवन करू नका तर पूर्ण फळ खावं.
२) सलादमध्ये भरपूर फायबर असतं, त्यामुळे रोज सलाद खावा.
३) ओट्स, ज्वारी, बाजरी, दलिया आणि डाळींचं सेवन करा.४) बदाम, पिस्ता आणि अक्रोडमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं.
५) राजमामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं.
६) मोड आलेल्या कडधान्यातूनही भरपूर प्रमाणात फायबर मिळतं.
७) हिरव्या भाज्यांचं सूप रोज सेवन कराल तर फायबर मिळेल.
८) भाजलेल्या चण्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं.
(टिप: वरील लेखात सुचवण्यात आलेल्या टिप्स आणि सल्ले केवळ माहितीसाठी आहेत. कोणत्याही प्रकारचा फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा डाएटमध्ये कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)