High cholestrol : 'या' तेलाने वाढते शरीरात कोलेस्ट्रॉलची लेव्हल, अजिबात करू नका सेवन; नाही तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 12:29 PM2022-02-22T12:29:38+5:302022-02-22T12:29:52+5:30

High Cholestrol : एका चांगल्या तेलात जेवण तयार केल्याने हाय कोलेस्ट्रॉलचा धोका कमी होऊ शकतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, हाय कोलेस्ट्रॉलच्या रूग्णांनी कोणत्या तेलातील पदार्थ खाऊ नयेत.

High cholestrol patients avoid this vagetable oil it can increases bad levels | High cholestrol : 'या' तेलाने वाढते शरीरात कोलेस्ट्रॉलची लेव्हल, अजिबात करू नका सेवन; नाही तर...

High cholestrol : 'या' तेलाने वाढते शरीरात कोलेस्ट्रॉलची लेव्हल, अजिबात करू नका सेवन; नाही तर...

googlenewsNext

हाय कोलेस्ट्रॉल (High Cholestrol) लेव्हल हृदयासंबंधी रोगांचं कारण ठरतं. अशात कोलेस्ट्रॉल लेव्हल योग्य ठेवणं गरजेचं असतं. हाय कोलेस्ट्रॉल तुम्ही चांगल्या डाएटने कंट्रोल करू शकता. कोलेस्ट्रॉल लेव्हल कंट्रोल करण्यासाठी चांगल्या आहाराची गरज तर आहेच, सोबतच महत्वाचं आहे की, तुम्ही कोणत्या तेलात जेवण तयार करता. एका चांगल्या तेलात जेवण तयार केल्याने हाय कोलेस्ट्रॉलचा धोका कमी होऊ शकतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, हाय कोलेस्ट्रॉलच्या रूग्णांनी कोणत्या तेलातील पदार्थ खाऊ नयेत.

काय असतं कोलेस्ट्रॉल?

कोलेस्ट्रॉल लिव्हर द्वारे निर्मित केलेला एक चरबीयुक्त पदार्थ आहे. जे सेल मेंब्रेन्सचं निर्माण करतं. कोलेस्ट्रॉल तसं तर शरीरासाठी आवश्यक आहे. पण याचं प्रमाण वाढलं तर समस्या निर्माण होते. कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल दुसरा म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल. गुड कोलेस्ट्रॉस शरीरासाठी चांगलं असतं, तेच बॅड कोलेस्ट्रॉल धमण्यांमध्ये अडथळा निर्माण करतं. असं झालं तर हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा कार्डियक अरेस्टचा धोका वाढतो.

हृदयासंबंधी रोग कमी करण्यासाठी हाय कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्याचे उपाय शोधले पाहिजे. द जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित एका रिव्ह्यूनुसार, पाम ऑइलचं सेवन केल्याने तुमच्या हाय एलडीएल लेव्हलचा धोका वाढतो. पाम ऑइल एक कुकिंग ऑइल आहे ज्याला पाम फ्रूटमधून काढलं जातं. याचं वैज्ञानिक नाव एलायस गायनेन्सिस आहे.

या रिसर्चनुसार, इतर कुकिंग ऑइलच्या तुलनेत पाम ऑइलमध्ये सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण अधिक असतं. सॅच्युरेटेड फॅट एक अनहेल्दी टाइपचं फॅट असतं जे तुमच्या रक्तात एलडीएल कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढवतो. पाम ऑइलसोबत इतरही काही ऑइलबाबत रिव्ह्यू करण्यात आला.

वैज्ञानिकांना आढळलं की, लो सॅच्युरेटेड व्हेजिटेबल ऑइलच्या तुलनेत पाम ऑइलचा वापर केल्याने एलडीएल कोलेस्ट्रॉल वाढतं. पाम ऑइलच्या तुलनेत लो सॅच्युरेटेड व्हेजिटेबल ऑइलने एचडीएल कोलेस्ट्रॉल वाढतं. एचडीएल कोलेस्ट्रॉल एलडीएल कोलेस्ट्रॉलच्या नुकसानकारक प्रभावांचा सामना करतं आणि हे लिव्हरमध्ये घेऊन जातं जिथून याला बाहेर काढलं जातं.

वैज्ञानिकांनी निष्कर्ष काढला की, पाम ऑइलमध्ये एलडीएल कोलेस्ट्रॉल इतर कुकिंग ऑइलच्या तुलनेत जास्त प्रमाणात आढळतं. पाम ऑइल कोलेस्ट्रॉलसाठी सर्वात खराब मानलं जातं. यात सॅच्युरेटेड ऑइल फॅट जास्त असल्याने, ब्लड लिपिड किंवा कोलेस्ट्रॉल वाढवू शकतं. अनेक रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, पाम ऑइल ब्लड लिपिडला वाईट प्रकारे प्रभावित करतं.
 

Web Title: High cholestrol patients avoid this vagetable oil it can increases bad levels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.