शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यामुळेही संतुलित केला जाऊ शकतो उच्च रक्तदाब, कसा? घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 16:19 IST

पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत राहते, त्यामुळे हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता कमी होते. जाणून घेऊया उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी किती पाणी आवश्यक आहे.

आजकाल प्रत्येक तिसरा व्यक्ती उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त आहे. उच्च रक्तदाब हा लोकांच्या जीवनशैलीचा एक भाग बनला आहे, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्यदायी आहारासोबतच औषधांचीही काळजी घ्यावी लागते. रक्तदाबाची समस्या कोणत्याही वयात उद्भवू शकते, परंतु वाढत्या वयात हाय बीपी हृदयाच्या समस्यांना उत्तेजन देऊ शकते. उच्च रक्तदाब नियंत्रित करण्याचे अनेक मार्ग आहेत, त्यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे निरोगी जीवनशैली.

नियमित व्यायाम केल्याने हृदय निरोगी राहते आणि तणावाची पातळी कमी होते. आरोग्यदायी आहारासोबत पाणी पिऊन आणि हायड्रेटेड राहूनही उच्च रक्तदाब कमी करता येतो. पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत राहते, त्यामुळे हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता कमी होते. जाणून घेऊया उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी किती पाणी आवश्यक आहे.

निर्जलीकरण आणि रक्तदाब -निरोगी आरोग्यासाठी हायड्रेटेड राहणे खूप महत्त्वाचे आहे. व्हेरीवेल हेल्थच्या माहितीनुसार, डिहायड्रेशन आणि रक्तदाब यांचा परस्पर संबंध आहे. जेव्हा शरीर योग्यरित्या हायड्रेटेड असते तेव्हा हृदय प्रभावीपणे पंप करण्यास सक्षम असते. त्यामुळे रक्ताभिसरण बरोबर राहते. डिहायड्रेशनच्या बाबतीत, हृदयाला पंप करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, ज्यामुळे रक्ताचे प्रमाण कमी होऊ लागते. जेव्हा रक्ताचे प्रमाण कमी होते तेव्हा रक्तदाब आणि हृदय गती दोन्ही उच्च होतात.

पाणी आणि हृदय आरोग्य -हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारण्यासाठी पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे. एका अभ्यासानुसार, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमयुक्त पाणी पिल्याने उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते. या पोषक तत्वांचे पाण्याद्वारे सेवन केल्याने शरीर त्यांना सहज शोषून घेऊ शकते. व्हिटॅमिन्स आणि मॅग्नेशियमसाठी पुदिना, काकडी, लिंबू आणि जामुन पाण्यात टाकता येते.

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी पाण्याचे प्रमाण -महिलांसाठी - महिलांनी दररोज सुमारे 11 कप किंवा 2.7 लिटर पाणी प्यावे. पुरुषांसाठी- पुरुषांनी दररोज 15 कप म्हणजेच 3.7 लिटर पाणी प्यावे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स